Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : गर्दीचा फायदा घेत महिलेचे दागिने लंपास

Crime News : गर्दीचा फायदा घेत महिलेचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुणे बसस्थानकावर बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील सोन्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांका भाऊसाहेब कानडे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादी सध्या नवी मुंबईत वास्तव्यास असून त्या वैयक्तिक कामानिमित्त माहेरी आल्या होत्या. 15 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या सावेडी येथून रिक्षाने पुणे बस स्थानकावर आल्या होत्या. तेथे मुंबईला जाणार्‍या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. बस सक्कर चौकात पोहोचल्यावर तिकीट काढण्यासाठी महिलेने पर्स तपासली असता, त्यात ठेवलेले दागिने आणि रोकड गायब असल्याचे लक्षात आले.

चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, 15 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 45 हजार रुपये किमंतीचे कानातील सोन्यांचे फुले आणि 5 हजार रुपयांची रोख रक्कम असा 80 हजार रुपयांचा समावेश आहे. संबंधित महिलेने तत्काळ सर्वत्र शोध घेतला, परंतु दागिने मिळून आले नाहीत. तातडीने मुंबईला जाणे आवश्यक असल्याने महिलेने 24 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...