Sunday, October 13, 2024
Homeराजकीयहा विषय आता इथे संपवावा; चंद्रकांत पाटलांची उदयनराजेंना हात जोडून विनंती

हा विषय आता इथे संपवावा; चंद्रकांत पाटलांची उदयनराजेंना हात जोडून विनंती

पुणे (प्रतिनिधि)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील वातावरण तपल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे हेही आक्रमक झाले असून राज्यपालांना हटवण्याच्या मागणी जो धरू लागली आहे.

- Advertisement -

दरम्यान,  छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सगळ्यांसाठी आदरणीय आहेत. त्यामुळे राज्यपालांकडून चुकून काही चूक झाली असेल तर त्यांनी हा विषय आता इथे संपवावा अशी हात जोडून विनंती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना केली आहे.

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आक्रमक होत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटावीसी वाटतात असं वक्तव्य केले आहे तर रायगडावर जाऊन आक्रोश करणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यावर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांना उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट हात जोडून विनंती करत त्यांनी हा विषय इथेच संपवण्याची मागणी केली आहे.

पाटील म्हणाले, उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्याबरोबरच ते आमचे आदरणीय नेते आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याशिवाय त्यांचा उल्लेख करणेही योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे आहेत.त्यामुळे माझी राजांना हात जोडून विनंती आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवनेरीवर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले आहे. त्यांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट चुकीची घडली असेल तर हा विषय त्यांनी इथेच संपवावा अशी विनंतीही त्यांनी येथे केली आहे. भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या आणि आमच्या कोणाच्याही डोक्यात छत्रपतींचा अनादर करणे हा विषय असूच शकत नाही असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या