Thursday, March 27, 2025
Homeमुख्य बातम्यापुणे : महापौरांपाठोपाठ विरोधीपक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना करोना; दोन खासदार, चार आमदार...

पुणे : महापौरांपाठोपाठ विरोधीपक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना करोना; दोन खासदार, चार आमदार क्वारंटाईन

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात महापौरांपाठोपाठ आता महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना करोनाची लागण झाली आहे. याशिवाय पुण्यातील दोन खासदार, चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. तसेच पालिकेच्या तब्बल 200 कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे.

पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. नुकतोच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सहा नगरसेवक यांना करोना झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्यासोबत काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे.

- Advertisement -

मला ताप आला होता. त्यामुळे मी करोना चाचणी केली. त्यानंतर मला करोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. आता माझी तब्येत ठिक आहे आणि माझ्यावर उपचार सुरु आहेत, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितले होते.पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर मुरळीधर मोहोळ हे अनेक ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते.

दरम्यान, यापूर्वीही राज्यातील राजकीय नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. ते करोनावर मात करुन घरी परतेल आहेत. त्यानंतर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही करोनाची लागण झाली होती. चव्हाणही आता उपचारानंतर सुखरुप घरी परतले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Case : “धनंजय मुंडेंना पाठीशी न घालता त्यांच्यावर…”; मनोज...

0
मुंबई | Mumbai बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची (Santosh Deshmukh Case) अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीतील...