पुणे | प्रतिनिधी | Pune
येथील कोंढवा परिसरात (Kondhwa Area) आज (शनिवारी) पहाटे गँगवॉरच्या (Gangwar) घटनेने खळबळ उडाली आहे. गणेश काळे या युवकाची गोळ्या (Firing) झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आंदेकर टोळीतील (Andekar Gang) चार सदस्यांनी घडवून आणल्याचे समोर आले आहे. गणेश काळेवर तब्बल सहा ते सात गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यानंतर कोयत्यानेही त्याच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात गणेश काळे (Ganesh Kale) गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून, तो सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे ही हत्या गँगवॉरमधून झाल्याची चर्चा आहे.
आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या (Murder) करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून येत आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळेचा भाऊ हा गणेश काळे आहे. त्यामुळे त्याच्या हत्येमागे गँगवॉर आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी वनराज आंदेकरची (Vanraj Andekar) हत्या कोमकर गँगकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.




