पुणे | Pune
गेल्या काही दिवसापासून पुणे (Pune Crime Newss) शहर कायम चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यामध्ये पुन्हा एकदा हत्येचा थरार पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची भर चौकात हत्या करण्यात आली.
पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाहीतर आरोपींनी गोळ्या घालून झाल्यावर कोयत्यानेही त्यांच्या सपासप वार केले. सदर घटनेचं भयानक सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलं आहे.
हे देखील वाचा : दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला आले पोलिस!
मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात हल्ला करण्यात आला. परिसरामध्ये ते थांबले असताना गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरामध्ये एकच घबराट उडाली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हे देखील वाचा : धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करुन…
याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद आणि पैशांवरु झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांची कसून चौकशी सुरु आहे.
वनराज आंदेकर यांच्या हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावे आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे.
हे देखील वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली पावणे तीन कोटींचा गंडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात