पुणे | Pune
पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीचा भाग असणार्या स्वारगेट एसटी आगारात गेल्या आठवड्यात एका २६ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शिरुर जिल्ह्यातील गुनाट गावात नराधम दत्तात्रय गाडे याला अटक केली होती. आता या प्रकरणात रोज नवनविन खुलासे समोर येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल सापडला आहे, त्याशिवाय पीडित तरूणीचा जबाबही पोलिसांकडून नोंदवण्यात आला. पीडित तरूणीने जे सांगितले, ते ऐकूण पोलिसही अवाक् झाले आहे. नराधम दत्ता गाडे अत्याचार करत होता, त्यावेळी पीडितेला कोलकाता प्रकरण आठवले. तरूणीने नराधमाकडे जिवंत ठेवण्याची विनवणी केली.
दत्तात्रय गाडे याने तरुणीने तिच्या मर्जीने आपल्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिली आणि तिने आरडाओरडा केला नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. अत्याचारावेळी दत्तात्रय गाडे याने आपल्याला जिवंत सोडावे, या एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही.
नराधम दत्ता गाडे पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून तिला घेऊन गेला. ती बससमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितीने बसमध्ये कोणीच नाही, मला खाली जायचे आहे, खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकळून दिले. पीडितने मदतीसाठी आवाजही दिले. पण, आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने जिवंत सोडावे यासाठी पीडिता बचावाच्या प्रयत्नात होती.
या तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली आहे, ती फार प्रतिकार करत नाही, ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली. तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. त्यामुळे दत्तात्रय गाडे याचे काम सोपे झाले. नराधम दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने गावाकडे जात असताना मित्राला आणि बहिणीला आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी तिला धीर दिला अन् पोलिसांत तक्रार करण्यात सांगितले.
आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीला पैसे दिल्याचा वकीलांचा दावा खोटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे बँक स्टेटमेंट देखील पोलिसांनी पडताळून पाहिले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीच्या खात्यावर केवळ २३९ रुपये शिल्लक होते. त्यामुळे वकिलाने केलेला दावा हा खोटा असल्याचे समोर आले. चोऱ्या करून जगणाऱ्या आरोपीच्या पैसे देण्याच्या वकीलाच्या दाव्याची हवाच पोलिस तपासात निघाली आहे.
पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्ता आणि पीडितेच्या मोबाइलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आले आहेत. त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले नाही, अशी माहिती समजत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा