Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने उचलले टोकाचे पाऊल...जे केलं तेही हैराण करणारे...

मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने उचलले टोकाचे पाऊल…जे केलं तेही हैराण करणारे…

पुणे | प्रतिनिधि

मुलाच्या वारंवार होणाऱ्या आजारपणाला कंटाळून झोपलेल्या मुलाचा गळा दाबून खून करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर भागात उघडकीस आला आहे. दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी वडिलांना अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

अभिजीत बाबुराव जायभाय (२८, राहाणार- तुकाई दर्शन, काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बाबुराव दिनकर जायभाय (वय ५० वर्षे) असे अटक करण्यात पित्याचे नाव आहे. याबाबत पत्नी सुनीता यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित, त्याची आई आणि वडील हे हडपसर परिसरातील तुकाईदर्शन येथे भाड्याने रहात होते. जायभाय कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. अभिजित याची आई धुणे भांडी करण्याचे काम करते तर वडील हामालीचे काम करतात. त्यांचा मुलगा अभिजित हा सारखा आजारी पडत असल्याने तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे घर चालवणे अवघड झाले होते. त्याच्या आजारपणावरच सर्व पैसा खर्च होत होता.

मुलाच्या सततच्या आजारपणाला वडील कंटाळले होते. हमालीची कामे त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामधून घर खर्च चालवायचा की मुलाच्या आजारपणाचे उपचार करायचे असा प्रश्न त्या पित्यासमोर नेहमी उभा असायचा. मुलाच्या सततच्या आजारपणाला वडील कंटाळले होते. हमालीची कामे त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामधून घर खर्च चालवायचा की मुलाच्या आजारपणाचे उपचार करायचे असा प्रश्न त्या पित्यासमोर नेहमी उभा असायचा.

अंगात पोलिसाचा गणवेश, पायात लाल शूज; फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड

त्याच मानसिक तणावातून वडील बाबुराव जायभाय यांनी गुरुवारी (दिनांक १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास तो घरात झोपलेला असताना त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे आणि विश्वास डगळे, युनिट ५ चे निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक, ATS ची कारवाई

त्याच मानसिक तणावातून वडील बाबुराव जायभाय यांनी गुरुवारी (दिनांक १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास तो घरात झोपलेला असताना त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे आणि विश्वास डगळे, युनिट ५ चे निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या