Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedपुणे विभागामध्ये बऱ्या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 80.97 टक्के

पुणे विभागामध्ये बऱ्या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 80.97 टक्के

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 36 हजार 219 झाली आहे.

- Advertisement -

तर ॲक्टीव रुग्ण संख्या 71 हजार 513 इतकी आहे. करोनाबाधीत एकुण 11 हजार 509 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.97 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील करोना बाधीत एकूण 2 लाख 84 हजार 21 रुग्णांपैकी 2 लाख 38 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 39 हजार 191 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.26 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.94 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील करोना बाधीत एकूण 37 हजार 300 रुग्णांपैकी 27 हजार 458 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 702 आहे. करोनाबाधित एकूण 1 हजार 140 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील करोना बाधीत एकूण 33 हजार 489 रुग्णांपैकी 25 हजार 166 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील करोना बाधीत एकूण 36 हजार 814 रुग्णांपैकी 28 हजार 97 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 363 आहे. करोनाबाधित एकूण 1 हजार 354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील करोना बाधीत एकूण 44 हजार 595 रुग्णांपैकी 34 हजार 64 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 90 आहे. करोनाबाधित एकूण 1 हजार 441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 626 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 298, सातारा जिल्ह्यात 683, सोलापूर जिल्ह्यात 405, सांगली जिल्ह्यात 988 तर कोल्हापूर जिल्ह्यात 252 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 713 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 3 हजार 28, सातारा 385, सोलापूर 511, सांगली 1 हजार 22 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 767 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या