Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपुण्यात शिंदे गटातील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; ऐन निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

पुण्यात शिंदे गटातील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; ऐन निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

पुणे | Pune
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यात धक्का बसला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत पुण्यातील शिंदे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विचारात घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना सतत डावलले जात होते व त्यांचे ऐकले ही जात नव्हते अशातच शिंदे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज होते. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे बोलले जात आहे. यासोबतच युवासेनेतील आणखी काही पदाधिकारी आणि वरच्या फळीतील पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे ही बोलले जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: विशेष ‘योग’ साधत PM मोदींनी वाराणसीतून केला उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान, काही दिवसांपुर्वी पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या वेळेस ही शिंदे गटातील नाराजीनाट्य समोर आले होते. मोदी शिंदे गटाच्या शहराध्यक्षांच्या घरी जेवणासाठी जाणार होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी जोरात तयारी देखील केली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी जेवणास नकार दिला होता, त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळाला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : मानसिक त्रास व धमक्यांना घाबरून महिलेसह प्रियकराची...

0
नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon फोनद्वारे आणि प्रत्यक्ष शारिरीक सुखाची मागणी करुन तसेच दिलेल्या मानसिक त्रासाला व धमक्यांना कंटाळून तालुक्यातील वंजारवाडी (Vanjarwadi) येथील प्रेमीयुगलाने धावत्या...