Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रGaneshotsav 2024 : मोरया! गणरायाच्या आगमनासाठी पुण्यनगरी सज्ज

Ganeshotsav 2024 : मोरया! गणरायाच्या आगमनासाठी पुण्यनगरी सज्ज

पुणे | प्रतिनिधी

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून, ढोल ताशांच्या गजरात व सनईच्या मंजूळ स्वरात गणरायाचे शनिवारी पुण्यात आगमन होणार आहे. गणेश चतुर्थीला मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पुण्यात बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने जय्यत तयारी झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचीही तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या गणपतीच्या मूर्तीची उत्साही वातावरणात प्रतिष्ठापना होईल.

YouTube video player

मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी मठाचे (कनेरी मठ) मठाधिपती आणि विश्वस्त अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी प्राणप्रतिष्ठा करतील. आगमन मिरवणुकीची सुरुवात सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी उत्सव मंडपातून होणार आहे. गणेशमूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात येईल.

हे ही वाचा : आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याचा मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाचा मृत्यू

प्रभात बँड पथक, संघर्ष ढोल-ताशा पथक, श्रीराम पथक आणि शौर्य ढोल-ताशा पथक यांचे बहारदार वादन होईल. मानाच्या दुसऱया श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारा वादन आणि न्यू गंधर्व ब्रास बँड पथकाचे वादन ऐकायला मिळणार आहे.

मानाच्या तिसऱया गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठा दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी युवा उद्योजक पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते होईल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अश्वराज ब्रास बँड व अन्य पथकांचा सहभाग असेल. साताराचे सजावटकार सुशील निगडे आणि विकास पवार यांनी फायबर ग्लासमध्ये बनवलेल्या आकर्षक गज महालामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान होणार आहे.

हे ही वाचा : संगमनेर पोलीस उपविभागात ६२ जणांना प्रवेश बंदी!

मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी होईल. मिरवणुकीत अग्रभागी लोणकर बंधूचा नगारा वादनाचा गाडा, शिवगर्जना आणि विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाचा सहभाग असणार आहे. मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजता रोनक रोहित टिळक यांच्या हस्ते होईल.

प्रथेप्रमाणे पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणूकीत गंधक्ष आणि श्रीराम ढोल-ताशा पथकाचे वादन होणार आहे. श्रीगणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक, रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा : लाडक्या बाप्पाच्या आगमासाठी बाजारपेठ सजली; सजावटींच्या वस्तू, पूजा साहित्य घेण्यासाठी भक्तांची गर्दी

तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी प्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या हस्ते होईल. मिरवणुकीत शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नुमवी, कलावंत आदी पथके असतील. अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता होईल. न्यू गंधर्व बँड पथकाच्या बहारदार वादनासह स्वराज्य, सामर्थ्य या पथकांचे शैलीदार वादन पुणेकरांना ऐकायला मिळणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाईची प्राणप्रतिष्ठा 11 वाजून 11 मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य मंदिरापासून सिंह रथातून गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर जूदुपारी 12 पासून भाविकांनी गणरायाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

हे ही वाचा : शरद पवार – अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले; सहकार मंत्र्यासमोरच घातला राडा!

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...