Thursday, April 2, 2026
Homeमहाराष्ट्रPune News : गावात भरदिवसा जादूटोणा? सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Pune News : गावात भरदिवसा जादूटोणा? सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

पुणे (प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील कडूस गावात जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे. बंद घरासमोर एक व्यक्ती जादूटोणा करत असल्याचा प्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

- Advertisement -

कडूस गावातील एक जुने, बंद घर, घराच्या दाराजवळ दही-भात, लिंबू, हळदकुंकू आणि नारळ ठेवून पूजा करताना एक पुरुष आणि चेहरा झाकलेल्या अवस्थेतील एका महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यातील पुरुषाच्या हातात पिशवी असून तो पिशवीतील वस्तू मांडताना दिसतो. नंतर लिंबूवर हळद-कुंकू लावून त्याठिकाणी नारळ फोडल्याचंही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

दरम्यान त्याचं हे कृत्य पाहून स्थानिक नागरिकांनी त्याला जाब विचारला. यावर त्याने आपण मुंबईतून आल्याचा सांगितलं. मात्र त्याने ही पूजा का केली, कुणासाठी केली याबाबत कुठलीही माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांमध्ये मात्र जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे आणि यातूनच हा जादूटोण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान ,भर गावात आणि भर दिवसा अशा प्रकारचं विचित्र कृत्य झाल्यामुळे त्या गावात भीतीच वातावरण पसरला आहे. आणि त्यात या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही वायरल झाल्यानंतर तर चर्चेला आणखी जोर आला आहे. स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. हा संपूर्ण प्रकार जादूटोण्याचा आहे की कुणाला धमकवण्यासाठी केलेली ही युक्ती आहे याचाही तपास पोलीस करतायेत.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime : खरातचा पाय खोलात; दुसऱ्या गुन्ह्यात बेड्या, आज...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या विळख्यात सापडलेला स्वयंघोषित कॅप्टन ऊर्फ भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या पोलीस कोठडीची...