संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Nashik Highway) अपघातांची श्रृंखला सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. मंगळवारी (दि. 6 ऑगस्ट) घारगाव (Ghargav) शिवारातील हॉटेल लक्ष्मीजवळ महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडील जागेवरच ठार (Death) झाले तर मुलगा गंभीर जखमी (Injured) झाला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समलेल्या अधिक माहितीनुसार, सिन्नर (Sinner) तालुक्यातील चास नळवाडी येथील रघुनाथ बबन जाधव (वय 40) व ऋतीक रघुनाथ जाधव (वय 14) हे दोघे बापलेक दुचाकीवरुन हॉटेल लक्ष्मीजवळ महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी पुणेकडून नाशिकच्या (Pune-Nashik) दिशेने जाणार्या भरधाव वेगातील कारचालक शशांक अशोक शिंगारे (वय 36, टिंगरेनगर, पुणे) यास वेग नियंत्रित न झाल्याने दुचाकीला जोराची धडक (Bike Hit) दिली.
यात वडील रघुनाथ जाधव हे जागेवरच गतप्राण झाले तर मुलगा ऋत्विक गंभीर जखमी (Injured) झाला. या घटनेची माहिती डोळासणे महामार्ग वाहतूक मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना समजताच त्यांनी फौजफाट्यासह अपघातस्थळी (Accident) धाव घेतली. त्यानंतर जखमीला तत्काळ उपचारार्थ हलवले. याप्रकरणी घारगाव पोलिसांत (Ghargav Police) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.