पुणे | वृत्तसंस्था | Pune
येथील स्वारगेट एसटी बस स्थानकावर (Swargate Bus Station) एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (Rape) झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही (Police) आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाखांचे बक्षिस देखील जाहीर केले आहे.
या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या (Police) प्राथमिक चौकशीनुसार,’आरोपी हा राजकीय व्यक्ती, पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या अनुषंगानेही चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, पुण्याच्या पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपी (Accused) गाडेच्या कुटुंबातील काही सदस्यांची चौकशी देखील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर ससूनमध्ये मुलीची (Girl) तपासणी केली असता तिचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून तिच्यावर दोनदा अत्याचार करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.