Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याPune News : स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय;...

Pune News : स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”

पुणे | Pune

येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील (Swargate Bus Stand) शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (Rape) झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही (Police) आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यानंतर आता या घटनेवर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना सरनाईक म्हणाले की,” सध्या महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार ३०० बस आहेत. यातील ४०० बसेस इलेक्ट्रिक तर ३५० बसेस भाडेतत्त्वावर आहेत. या सर्व बसमध्ये जीपीएस आणि एआय प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यातील (Pune) स्वारगेट येथील घटनेनंतर सर्व एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत”, असेही त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “महामंडळाच्या अनेक बसची दुरावस्था झाली आहे. त्यातील अनेक बस मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आगारात मोडकळीस आलेली वाहने १५ एप्रिलपर्यंत भंगारात हलविण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षारक्षकांमध्ये महिलांची (Women) संख्या वाढवणार आहे. त्याबरोबरच महामंडळाच्या बसेसमध्ये सीसीटीव्हीसह जीपीएस बंधनकारक असेल. शिवाय सर्व बसेस आणि एसटी आगारात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचेही”, मंत्री सरनाईक यांनी म्हटले.

एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच

स्वारगेट एसटी आगाराच्या कडेला बंद असलेल्या एसटी बसमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच पडल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते वंसत मोरे (Vasant More) यांनी माध्यमांशी बोलतांना केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...