Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रPune News : मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात लघुशंका करत तरुणाचा 'नंगानाच'; Video व्हायरल

Pune News : मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात लघुशंका करत तरुणाचा ‘नंगानाच’; Video व्हायरल

पुणे | Pune

पुण्यातील (Pune) कल्याणीनगर भागात गेल्यावर्षी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात दोन जणांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील (Pune City) अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने (Youth) आलिशान बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून रस्त्यातच लघुशंका करत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या व्हायरल झालेल्या शास्त्रीनगर चौकातील (Shastrinagar Chowk) सिग्नलवर निळ्या रंगाची एक आलिशान बीएमडब्लू गाडी उभी असल्याचे दिसते. तर गाडीच्या शेजारीच तरुण लघुशंका करत आहे. व्हिडीओ काढणाऱ्यांनी जेव्हा तरुणाला याबाबत जाब विचारला तेव्हा सदर तरुणाने अश्लिल हावभाव करून दाखवले. तसेच यावेळी गाडीत आणखी एक तरुण बसलेला दिसत आहे. ज्याच्या हातात दारूची बाटली दिसत असून तो व्हिडीओ काढा असे सांगत आहे.

या घटनेमुळे पुणे शहरात महिलांची (Women) सुरक्षा आणि सदर चालकांच्या अश्लील वर्तनावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कडक कायदा करावा आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. स्थानिक लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची (Torture) घटना घडली होती. त्यामुळे पुण्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या घटनेवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...