Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांकडून नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला अटक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांकडून नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला अटक

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत असून ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तामिळनाडू येथून अटक (Arrested) केली आहे. त्यानंतर त्याला अंधेरी सेशन्स कोर्टात (Court) हजर करण्यात आले असता कोर्टाने सोमवार (दि.२३ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती…

- Advertisement -

यानंतर पोलीस कोठडी संपल्यावर पुन्हा एकदा शुक्रवार (दि, २७ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी नाशिकमधील एका सराफ व्यावसायिकाला अटक केली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज माफिया ललित पाटील याला नाशिकच्या सराफ बाजारातील एका सराफ व्यावसायिकाने बेकायदेशीर सोने उपलब्ध करून दिल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सराफ व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

दरम्यान, ललित पाटीलच्या पोलिसांनी मुसक्या आळल्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ललितने स्वतः आपण ससून रूग्णालयातून (Sassoon Hospital) पळून गेलो नाही, तर आपल्याला पळवण्यात आल्याचा दावा केला आहे. तर ललित पाटीलच्या अटकेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणात ललितसह मंत्री दादा भुसे व शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या