Tuesday, September 8, 2026
HomeराजकीयPune Rave Party Raid : खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात; डॉ. प्रांजल...

Pune Rave Party Raid : खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात; डॉ. प्रांजल खेवलकरचा अल्कोहोल रिपोर्ट आला समोर

पुणे | Pune

पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरात शनिवारी (दि.२६) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या छाप्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती डॉ.प्रांजल खेवलकर (Dr. Pranjal Khewalkar) सापडले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

त्यानंतर काल (रविवारी) पोलिसांनी (Police) या प्रकरणामध्ये डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, माळवाडी), समीर फकीर सय्यद (वय ४१, एनआयबीएम रस्ता), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, वाघोली), श्रीपाद मोहन यादव (वय २७, आकुर्डी), ईशा देवज्योत सिंग (वय २२, औंध), प्राची गोपाल शर्मा (वय २३, म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

यानंतर त्यांना न्यायालयात (Court) हजर केले असता सातही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाचा अहवाल ससून रुग्णालयाने (Sassoon Hospital) पुणे पोलिसांना (Pune Police) सुपूर्द केला आहे. पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी मद्याचे सेवन केले असल्याचा अहवाल मिळाला आहे.

दरम्यान, या अहवालानुसार एकनाथ खडसेंचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी दारू (Alcohol) पिल्याचे स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. तर ड्रग्सचे सेवन केले होते की नाही? हे एफएसएल अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सर्व आरोपींचे रक्ताचे व लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चार ते सहा दिवसात फॉरेन्सिक लॅबमधून आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते का? याचा अहवाल मिळणार आहे.

कारवाईत पोलिसांना काय-काय सापडलं?

खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमधील खोली क्रमांक १०२ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. यात आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, १० मोबाइल, दोन कार, हुक्का पॉट आणि दारू, मोबाइल आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ४१ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “मराठा समाजाला आतापर्यंत आमच्या सरकारने…”; CM फडणवीस स्पष्टच...

0
रायगड | Raigad मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवालीत उपोषणाला बसले असून, आज (मंगळवार) त्यांच्या उपोषणाचा ११ वा...