Friday, April 25, 2025
Homeक्राईमCrime News : पुण्यातील सोनार नगरमधील ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात

Crime News : पुण्यातील सोनार नगरमधील ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात

प्रेमसंबंधात अडकवून 27 लाख उकळले || पती- पत्नीवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केडगाव उपनगरात राहणार्‍या महिलेने तिच्या पतीच्या मदतीने पुण्यातील उरळी कांचन येथील रहिवासी सोनार व्यावसायिकाला ‘हनीट्रॅप’ च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून वेळोवेळी 27 लाख 56 हजार 162 रूपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित सोनाराने रविवारी (6 एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शितल कैलास काळे व तिचा पती कैलास अंबादास काळे (दोघे रा. दुधसागर सोसायटी, गल्ली नंबर तीन, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोनार व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे की, 2012 साली व्यवसायाच्या ओळखीमुळे शितल काळे हिच्याशी संपर्क आला आणि ओळख पुढे वाढत गेली. वेळोवेळी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीव्दारे दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. पुढे शितल हिने भावनिक ओलावा निर्माण करून शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध गुप्त व्हिडीओ व फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आले. दरम्यान, याच फोटो आणि व्हिडीओंच्या आधारे धमकावून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. पार्लर उघडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करून सुमारे 98 हजार 812 रूपयांचे साहित्य, रोख रक्कम दिली.

तसेच दोन वेळा वेगवेगळ्या मोपेड गाड्याही घेतल्या. 2024 साली फिर्यादी यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरील घर विकून 18 लाख रूपये मिळवले. यापैकी बहुतांश रक्कम शितल हिला दिली असून, त्या पैशातून तिने केडगाव उपनगरातील भुषणनगर भागात 43 लाखांचे घर खरेदी केले. त्या घरावरील कर्जाचे हप्तेही फिर्यादी यांनी भरण्याचे कबूल केले आहे. मार्च 2025 मध्ये हप्ता न भरल्यावर शितल हिने पुन्हा धमकावणे सुरू केले. आजपर्यंत फिर्यादी यांनी ऑनलाईन पध्दतीने पाच लाख 47 हजार 814 रुपये व रोख स्वरूपात 22 लाख आठ हजार 348 रुपये, तसेच दोन मोपेड गाड्या असे एकूण अंदाजे 27 लाख 56 हजार 162 रुपये शितल व तिच्या नवर्‍याला दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत केला आहे.

आत्महत्येचा विचार
या प्रकरणात फिर्यादी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांच्यावर मानसिक तणाव इतका वाढला होता की त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता. त्यांच्या पत्नीने धीर देत घर विक्रीचा सल्ला दिला आणि हा सर्व प्रकार तिला सांगण्यात आला. हा प्रकार केवळ व्यक्तिगत फसवणुकीपुरता मर्यादित नसून, भावनिक व आर्थिक शोषणाचा गंभीर नमुना असल्याचे या प्रकरणावरून दिसून येते. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...