Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे : अखेर "ती" महिला रुग्ण सापडली !

पुणे : अखेर “ती” महिला रुग्ण सापडली !

पुणे | प्रतिनिधि | Pune

पुण्यातून जम्बो कोविड हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेली 33 वर्षीय रूग्ण महिला अखेर सापडली आहे. पिरंगुट भागात तिच्या नातेवाईकांना ती आढळून संबंधित आली आहे. महिलेला खरंतर 5 तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली आणि तिकडेच बेवारस राहत होत पण ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात देताच माध्यमातूनही यासंबंधीच्या बातम्या प्रसारीत झाल्या आणि एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

आज अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध लागला आहे. पण या घटनेमुळे जम्बो हॉस्पिटलची नाहक बदनामी झाल्याची खंत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तर जम्बो हॉस्पिटलकडून व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यानेच आमचा रुग्ण बेपत्ता झाला होता,असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केली. दरम्यान, या घटनेत नेमकं चुकलंय, याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करताहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या