Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPune Swargate Crime: एक लाखाचे बक्षिस कोणाला देणार? पुणे पोलिस आयुक्त अमितेश...

Pune Swargate Crime: एक लाखाचे बक्षिस कोणाला देणार? पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टच सांगितले…

पुणे | Pune
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय रामदास गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेल्या दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून मध्यरात्री दोनच्या सुमारास अटक करण्यात आली.मध्यरात्री पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढला आणि एका कॅनलजवळून आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेच्या शोधासाठी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. आता हे बक्षीस कोणाला देणार, यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट उत्तर दिले.

आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या कारवाईची माहिती देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, क्राइम ब्राच, झोन टू आणि वेगवेगळी पथक आम्ही ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागच्या तीन दिवसांपासून आरोपीच्या शोधात होता. स्थानिक ५०० लोकांचे सहकार्य आम्हाला मिळाले. श्वान पथकाला वेगवेगळ्या ठिकाणचा वास दिला होता. शिवाय ड्रोनच्या माध्यमातूनही उसाच्या शेतात शोध घेण्यात आला. रात्री १ वाजून १० मिनिटांनी आरोपीला ताब्यात घेतले. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला लवकर शिक्षा देण्याबाबत पाऊल उचलणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले.

- Advertisement -

रात्री साडेदहाच्या सुमारास दत्ता गाडेला तहान लागल्यानं तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेला. त्यांच्याकडून पाण्याची बाटली घेऊन मी पोलिसांना शरण जाणार आहे असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने पुन्हा गाडेचा शोध सुरू केला. गावकऱ्यांकडूनही गाडेला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आवाहन करण्यात येत होते. शेवटी तपासादरम्यान, दत्तात्रय गाडे पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोधमोहिम घेत होतो. आरोपीला पकडण्यासाठी ५०० पोलिसांकडून त्याचा शोध घेत होती. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत”, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

आरोपी दत्ता गाडे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. हे बक्षीस कोणाला देण्यात येणार, यावर पोलीस आयुक्तांनी भाष्य केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की,”एक लाखाचे बक्षीस हे सर्वात शेवटी ज्यांनी माहिती दिली त्यांना दिले जाणार आहे. गाडेची शेवटची माहिती तो जिथे पाणी मागण्यासाठी गेला होता त्यांनी दिली. त्यानंतर मोटारसाईकल आणि ट्रोनच्या मदतीने त्याची दिशा कळली आणि त्याला अटक करण्यात आली. शेवटी ज्यांनी माहिती दिली त्यांना हे एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे,” अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुणे | Pune
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय रामदास गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेल्या दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून मध्यरात्री दोनच्या सुमारास अटक करण्यात आली.मध्यरात्री पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढला आणि एका कॅनलजवळून आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेच्या शोधासाठी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. आता हे बक्षीस कोणाला देणार, यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट उत्तर दिले.

आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या कारवाईची माहिती देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, क्राइम ब्राच, झोन टू आणि वेगवेगळी पथक आम्ही ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागच्या तीन दिवसांपासून आरोपीच्या शोधात होता. स्थानिक ५०० लोकांचे सहकार्य आम्हाला मिळाले. श्वान पथकाला वेगवेगळ्या ठिकाणचा वास दिला होता. शिवाय ड्रोनच्या माध्यमातूनही उसाच्या शेतात शोध घेण्यात आला. रात्री १ वाजून १० मिनिटांनी आरोपीला ताब्यात घेतले. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला लवकर शिक्षा देण्याबाबत पाऊल उचलणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले.

रात्री साडेदहाच्या सुमारास दत्ता गाडेला तहान लागल्यानं तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेला. त्यांच्याकडून पाण्याची बाटली घेऊन मी पोलिसांना शरण जाणार आहे असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने पुन्हा गाडेचा शोध सुरू केला. गावकऱ्यांकडूनही गाडेला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आवाहन करण्यात येत होते. शेवटी तपासादरम्यान, दत्तात्रय गाडे पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोधमोहिम घेत होतो. आरोपीला पकडण्यासाठी ५०० पोलिसांकडून त्याचा शोध घेत होती. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत”, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

आरोपी दत्ता गाडे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. हे बक्षीस कोणाला देण्यात येणार, यावर पोलीस आयुक्तांनी भाष्य केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की,”एक लाखाचे बक्षीस हे सर्वात शेवटी ज्यांनी माहिती दिली त्यांना दिले जाणार आहे. गाडेची शेवटची माहिती तो जिथे पाणी मागण्यासाठी गेला होता त्यांनी दिली. त्यानंतर मोटारसाईकल आणि ट्रोनच्या मदतीने त्याची दिशा कळली आणि त्याला अटक करण्यात आली. शेवटी ज्यांनी माहिती दिली त्यांना हे एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे,” अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...