Friday, May 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVaishnavi Hagavane Death Case: निर्लज्जपणाचा कळस! राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे फरार असताना...

Vaishnavi Hagavane Death Case: निर्लज्जपणाचा कळस! राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे फरार असताना हॉटेलमध्ये मटणावर ताव; व्हिडीओ व्हायरल

पुणे | Pune
वैष्णवी हगवणे हिने सासरकडील जाचाला कंटाळून अखेर आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप कस्पटे कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी तिची सासू, नणंद आणि नवरा यांना अटक करण्यात आली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वैष्णवी हगवणे हुंडा बळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशातच आता मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून बावधन पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, राजेंद्र हगवणे याला अटक कशी झाली? याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, जमीन खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हा छळ सुरू झाला होता, असेही कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

अटकपूर्वीचा या दोघांचा जेवणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपींनी फरारी काळात आरामात हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

निर्लज्जपणाचा कळस गाठला
वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर अटकेच्या भीतीने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघे फरार झाले होते. या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोघांना शुक्रवारी भल्या पहाटे अटक केली. या अटकेपूर्वी या दोघांनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर मनसोक्त ताव मारला. या विषयीचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. त्याच्यासोबत काही मित्र होते, पण हे मित्र कोण होते? याची माहिती अद्याप समोर आली नाही. मित्रांचा राजेंद्र पळवण्याचा डाव होता का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

सापळा रचत केली अटक
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (शुक्रवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ट्रम्प

Donald Trump On Harvard University: ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये आता आणखी एका...