मुंबई | Mumbai
आयपीएल १६ मध्ये (IPL 2023) आज बुधवार (दि.१७) रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर पंजाबकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings and Delhi Capitals) यांच्यात सामना होणार आहे…
आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत पंजाबकिंग्ज ६ विजय आणि ६ पराभव स्वीकारून १२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्ससाठी ही लढत म्हणजे एक औपचारिकता असणार आहे. दिल्लीचे आव्हान याआधी पंजाबकिंग्जविरुद्ध झालेल्या पराभवामुळे संपुष्टात आले आहे. तर पंजाबकिंग्जने आपला अखेरचा सामना जिंकला असल्यामुळे दिल्लीवर पुन्हा एकदा विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीत आपल्या आशा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
सकल हिंदू समाजाकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात शुद्धीकरण
पंजाबकिंग्जचे कर्णधारपद शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) असून दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा डेविड वॉर्नरकडे (David Warner) आहे. तसेच आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२३ ची विजयी सांगता करण्यासाठी सज्ज असणार आहे. तर पंजाबकिंग्ज दिल्लीवर विजय मिळवून अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असेल.
नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा; पत्रकारांना मारहाण
दरम्यान, पंजाबकिंग्जला पराभवाची धूळ चारून त्यांचे आव्हान अधिक खडतर करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज असणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स पंजाबकिंग्जला कडवी झुंज देण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाबकिंग्ज यांच्यात एकूण ३० लढती झाल्या असून यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी १५-१५ विजय संपादन केले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमका कोणता संघ वरचढ ठरणार? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक