धरमशाला | Dharamshala
आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) शुक्रवारी १९ मे २०२३ रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर पंजाबकिंग्ज (Punjab Kings) संघाचा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाशी होणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे…
आजच्या सामन्यात दोन्ही संघांना बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे. तर पराभूत संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात येणार आहे. आयपीएल २०२३ मधील गुवाहाटीच्या बरस्परा क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबकिंग्ज संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला होता.
या पराभवाचा बदला घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक असणार आहे. धरमशाला येथील दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबकिंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसंघाकडून ११२ धावांनी दारुण पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे बाद फेरीच्या आशा जिवंत राखण्यासाठी पंजाबकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांना विजय आवश्यक असणार आहे.
सिन्नर बाजार समिती निवडणुकीत सत्तांतर; वाजे गटाची बाजी
याशिवाय इतर संघाच्या निकालांवर आवर्जून आपले लक्ष ठेवावे लागणार आहे राजस्थान रॉयल्स संघाची धावगती अद्यापही सकारात्मक आहे. ही त्यांच्या संघासाठी दिलासादायक बाब आहे. दुसरीकडे पंजाबकिंग्ज संघाची धावगती नकारात्मक असल्यामुळे त्यांना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद संजू सॅमसन सांभाळेल .तर पंजाबकिंग्ज संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे असणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात पराभव स्वीकारल्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघांची नजर असणार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Nashik : शेततळ्यात पडून ग्रामपंचायत महिला सदस्याचा मृत्यू
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २४ सामने झाले असून हेड टू हेड सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचे पारडे जड राहिले आहे. राजस्थान संघाने १४ तर पंजाबकिंग्ज संघाने १० सामन्यात विजय मिळवला आहे.
आजचा सामना पंजाबकिंग्ज संघाच्या घरच्या मैदानावर होणार असल्यामुळे आजच्या सामन्यात विजयासाठी पंजाबकिंग्ज संघाला आपल्या घरच्या समर्थकांचा पाठींबा मिळण्याची शक्यता असल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघावर आजच्या सामन्यात पंजाबकिंग्ज वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
सलिल परांजपे, नाशिक.
धक्कादायक! सासरचे लोक मुलाचे बरेवाईट करतील या भीतीने वडिलांची आत्महत्या