Thursday, January 29, 2026
Homeदेश विदेशJasbir Singh Youtuber: भारताशी गद्दारी करणाऱ्यांची यादी संपता संपेना! 'हेरगिरीच्या' आरोपाखाली पंजाबमधून...

Jasbir Singh Youtuber: भारताशी गद्दारी करणाऱ्यांची यादी संपता संपेना! ‘हेरगिरीच्या’ आरोपाखाली पंजाबमधून आणखी एक युट्युबरला अटक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हेरगिरीच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पंजाब पोलिसांनी आणखी एका युट्यूबर जसबीर सिंगला अटक केली आहे. जसबीर सिंग जान महल चॅनेल चालवत असून त्याचे 11 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. जसबीर सिंगला पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

रुपनगर जिल्ह्यातील महलान गावातील रहिवासी असलेल्या सिंगवर मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSOC) ने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली. युट्युबर असलेली ज्योती मल्होत्राशीही त्याचा नियमित संपर्क होता. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जसबीर सिंगचे पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी शाकीर उर्फ ​​जुट रंधावाशी जवळचे संबंध होते, जो भारतीय वंशाचा असून तो इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) साठी काम करत असल्याचा संशय आहे.

- Advertisement -

पंजाब पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, जसबीर सिंग दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी झाला होता, जिथे तो पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सना भेटला. जसबीरन २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये तीन वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या मोबाईल फोनमध्ये अनेक पाकिस्तानी फोन नंबर सापडले आहेत, ज्यांची आता फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.

YouTube video player

ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर, जसबीर सिंगने आयएसआयशी संबंधित पीआयओंशी झालेल्या संपर्काचे सर्व ट्रेस हटवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरुन तो समोर येऊ नये. पोलिसांचे म्हणणे आहे की ते हेरगिरी-दहशतवादी नेटवर्कची संपूर्ण व्याप्ती उघड करण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी काम करत आहेत. गगनदीप सिंगला अटकही करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत सात जणांना केली अटक
आतापर्यंत पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सात जणांना अटक केली आहे. फलकशेर मसीह आणि सूरज मसीह यांना अमृतसरमधील अजनाला येथून अटक करण्यात आली होती आणि मालेरकोटला येथील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय महिला गुजाला आणि यामीन मोहम्मद यांनाही गेल्या महिन्यात ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंग – यांना नंतर गुरदासपूर येथून पोलिसांनी अटक केली. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जसबीर सिंगचे पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी शाकीर उर्फ ​​जुट रंधावाशी जवळचे संबंध होते, जो भारतीय वंशाचा व्यक्ती इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस साठी काम करत असल्याचा संशय आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

default-featured-image

Ajit Pawar Death : थोड्याच वेळात अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी काल (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान...