Monday, April 28, 2025
Homeक्रीडाआयपीएल १३ : राजस्थानच्या रॉयलसमोर पंजाबचे आव्हान

आयपीएल १३ : राजस्थानच्या रॉयलसमोर पंजाबचे आव्हान

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएल स्पर्धेत रविवारी राजस्थान रॉयल्स समोर पंजाबच्या किंग्जचे आव्हान असणार आहे. सलामी सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जवर मात करून स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

- Advertisement -

आता हीच विजयी मोहीम रविवारी होणाऱ्या सामन्यात कायम राखण्यासाठी रॉयल्स सज्ज आहे. शिवाय जोस बटलर संघात पुनरागमन करणार असल्यामुळे संघाची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे.

तर दुसरीकडे पंजाब संघाने दिल्लीविरुद्ध झालेला पराभव मागे सारून बंगळुरविरुद्ध एकतर्फी विजय संपादन करून विजयी लय परत मिळवली आहे. आता हीच लय कायम ठेवण्यासाठी पंजाबचे खेळाडू काय योजना आखतात ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

राजस्थान संघाबद्दल सांगायचे झाले तर , संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मीथ चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.

पंजाब संघाबद्दल सांगायचे झाले तर , कर्णधार लोकेश राहुल, मयांक अगरवाल चांगली फलंदाजी करत आहेत त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे.

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...