पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
ग्रामिण भागाचा कायापालट दुग्ध व्यवसायामुळे झालेेला आहे परंतू सध्या थंंडीची तिव्रता वाढल्यामुळे दुध देणार्या दुभत्या पशूच्या दुग्ध उत्पादनावर वाढत्या थंडीमुळे परिणाम होऊन दुधात घट झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे, असे दुग्धउत्पादक शेतकरी दिलीप बनकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्यात सध्या तिव्र थंडीची लाट असून याचा परिणाम दैनंदिन जनजीवन जगण्याच्या शैली वर होत आहे शिवाय कोविड-19 मुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झालेले आहे. सध्या थंडीची तीव्रता असणारी लाट आली आहे. त्यामुळे अनेकांच्या काम करण्याच्या दैनंदिन जीवन शैलीवर परिणाम झाला. ग्रामीण भागात शेतकरी व दुधारू पशूपालक याच्या जीवनातील कायापालट करणारा दुग्धव्यवसाय कायम पावसाळा, उन्हाळा तसेच हिवाळ्यातही अडचणीत येतो. दुभत्या पशुधनाची नेहमी तीनही ऋतूत परवड होते असते. शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत ज्या शेतकर्यांचे दुग्ध उत्पादनावर आर्थिक व्यवहारावर अवलंबून आहेत. त्या शेतकर्यांना पशुधन सांभाळताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण चाराटंचाई, पशुखाद्य किंमती दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमंतीमुळे वाढत आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी शेतमजूर व इतरांचे कंबरडे मोडत आहे.
थंडीच्या तिव्र लाटेमुळे दुधाच्या दहा लिटर मागे अंदाजे सरासरी दिड ते दोन लिटर दुधाची घट येत आहे कारण दुधारू म्हशी व गायींच्या खाण्यात व पाणी पिण्याच्या सवयीत बदल होऊन दिवसातून पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम पचनक्रियावर होत आहे. थंडीत दुधारू पशुधनाच्या आहाराची व प्रकृतीची काळजी घ्यावी लागत आहे. औषधाच्या वाढलेल्या किमती तसेच त्यामुळे सध्याच्या वातावरणातील बदलामुळे थंडी खूप वाढली आहे. याचा परिणाम दुधारू पशूच्या दुध देण्यात घट होत आहे.
यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. शेतकरी आधीच अडचणीत त्यात दुग्ध उत्पादनात घट येत आहे अशा एक ना अनेक संकटामुळे बेजार झालेल्यां शेतकर्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुग्ध उत्पादन घटल्या मुळे दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापाडला आहे, असे दुग्ध उत्पादक शेतकरी दिलीप बनकर यांनी स्पष्ट केले आहे.