Saturday, May 18, 2024
Homeनगरपुणतांबा परिसरात बिबट्यांचा वावर, ग्रामस्थ भयभित

पुणतांबा परिसरात बिबट्यांचा वावर, ग्रामस्थ भयभित

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गेल्या काही दिवसापासून पुणतांबा व बोरबने वस्ती परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. चार दिवसांपूर्वीच बोरबने वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. ही घटना ताजी असतानाच मातुलठाण रोड शिवारात पिसेवस्ती जवळ बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकर्‍यांची जनावरे बाहेर असतात रात्रीच्या वेळी बिबट्या त्यांच्यावर हल्ला करू शकतो. जनावरे बिबट्याची भक्ष बनू नये यासाठी पशुपालकांना अनेक रात्री जागून काढाव्या लागत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे रात्री अपरात्री शेतकर्‍यांना पिकांना पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते. सकाळी लहान मुले, विद्यार्थी, ग्रामस्थ त्या रस्त्याने ये जा करतात. वनविभागाने मातुलठाण शिवारात पिसे वस्ती जवळ तात्काळ पिंजरा बसवावा अशी मागणी ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या