Thursday, September 10, 2026
HomeनगरAccident News : पुणतांबा फाट्यावर कंटेनरच्या धडकेत वृद्ध ठार

Accident News : पुणतांबा फाट्यावर कंटेनरच्या धडकेत वृद्ध ठार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

कोपरगाव शहरातील पुणतांबा फाटा येथे पायी चालत जाणार्‍या 75 वर्षीय व्यक्तीला कंटेनरने जोरदार धडक (Container Hit) दिल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) रायभान रघुनाथ टेके (वय 75, रा. कोकमठाण) यांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडकडून (Manmad) नगरच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक युपी 78 सीटी 7957 पुणतांबा फाट्याजवळून (Puntamba Phata) जात असताना रस्त्याच्या कडेला पायी चालत असलेल्या रायभान टेके यांना धडकला. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस (Kopargaon City Police) तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी टेके यांना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी कंटेनरच्या क्लीनरला ताब्यात घेतले आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून या अपघाताबाबत कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने कोकमठाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...