Saturday, July 27, 2024
Homeनगरपुणतांबा रास्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत

पुणतांबा रास्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या होणार्‍या पचवार्षिक निवडणूकीत नेहमीच्या तीन पॅनेलमध्ये लढत होत असून सरपंच पदासाठी मात्र पाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी 8 माहिलांनी तर 17 सदस्यासाठी 92 जणांनी अर्ज भरले होते. छाननीमध्ये 3 सदस्याचे अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. काल 3 वाजेपर्यंत सरपंच पदासाठीच्या 3 जणांनी माघार घेतली तर सदस्यापैकी 35 जणानी अर्ज मागे घेतले त्यामुळे 17 सदस्यासाठी अपक्षासह 54 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

- Advertisement -

दोन दिवसापासून अर्ज मागे घेण्यासाठी तीनही पॅनेलच्या प्रमुख नेत्यांनी खूपच परिश्रम घेतले, अनेकांची मनधरणी केली. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्याची समजूत काढली. काहीना पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणूकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन तर काहींना कुठेतरी नोकरीत सामावून घेण्याचे गाजर दाखविण्यात आहे. उमेदवारीवरून काही उमेदवार व पॅनेल प्रमुख यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या. अनेक पॅनल प्रमुखांनी स्वतः तसेच अत्यंत जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे समजताच निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे तिकीट वाटपावरूनच काल काही पॅनलमध्ये धुसफुस सुरु झाली. ती शांत होण्याचे नाव घेईना.

ग्रामपंचायत निवडणूकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तारुढ जनसेवा मंडळाचे नेतृत्व डॉ. धनंजय धनवटे करत आहे. त्यांच्या विरुद्ध आ आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा मंडळ लढत देत असून त्याचे नेतृत्व अ‍ॅड. मुरलीधर थोरात करत आहे तर युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणतांबा विकास आघाडीचा तिसरा पॅनल असून शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव या पॅनलेचे नेतृत्व करत आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे तसेच शिवसेनेचे महेश कुलकर्णी यांनी सरपंच पदासाठी महिला उमदेवार निवडणूक रिंगणात उतरविल्या मुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

सरपंच पदासाठी स्वाती जालिंदर पवार, मनिषा संदीप गोरे, नंदा नामदेव पवार, श्वेता प्रकाश खुरसणे, पुणतांबा युवा ग्रामस्थ पॅनलकडून स्वाती सागर मोरे तसेच अर्चना किशोर पवार या सहा महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पुणतांबा रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे 6 प्रभाग असून 17 जागासाठी निवडणूक होत आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतुन होणार आहे. अंदाजे 14 हजार 985 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. कालच सर्व पॅनल व अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप झाले असून रात्रीपासूनच प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. सद्यस्थिती व उमेदवारी वाटपामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

पुणतांबा रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायात आहे. सर्व निधीची बेरीज करता वार्षिक अंदाजपत्रक 6 कोटीपर्यत आहे ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी या वेळेस काही नेते स्वतः, काहींच्या पत्नी, भावजयी, मुली तसेच सून सुद्धा निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेक वर्ष राजकारण करणार्‍यांनी आता आपले राजकीय वारसदार निवडणूकीत उतरून आम्हाला विकासासाठी सत्ता हवी हा संदेश पुणतांबेकराना दिला. अशी चर्चा होती. 5 तारखेला त्याचे उत्तर मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या