Tuesday, May 28, 2024
Homeनगरअहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा स्वतंत्र जागेत बसवावा ; धनगर समाजाची मागणी

अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा स्वतंत्र जागेत बसवावा ; धनगर समाजाची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांचा पुतळा (statue) स्वतंत्र जागेत बसविण्यात यावा, अशी मागणी शासकीय विश्रामगृह (Government Rest House) येथे झालेल्या सकल धनगर समाज बांधवांच्या (Sakal Dhangar Samaj Bandhaw) बैठकीत करण्यात आली. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक (Mayor Anuradhatai Adik) यांनी पुतळा बसविण्याच्या खर्चास दिलेल्या मंजुरीच्या निर्णयाचे बैठकीत स्वागत (Welcome) करण्यात आले.

- Advertisement -

सदरचा पुतळा दोन महापुरुषांच्या मध्ये न बसविता बॅ. रामराव आदिक पुतळ्याशेजारील रिकाम्या जागेत स्वतंत्रपणे बसविण्यात यावा, अशी मागणी सकल धनगर समाजाच्यावतीने करण्यात आली. बैठकीत स्वतंत्र जागेत युनिटी हॉस्पिटलसमोरील सर्कलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, धनगर समाज बांधवांकरिता समाज मंदिर बांधण्यासाठी स्वतंत्र 20 गुंठे जागा नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या या बैठकीत करून याबाबतचे ठराव करण्यात आले.

बैठकीत विठ्ठलराव राऊत म्हणाले की, राजमातेचा स्वतंत्र पुतळा बसविण्याकरिता समाज 15 वर्षापासून संघर्ष करित आहे. या मागणीसंदर्भात निवेदन देण्यासाठी दि. 7 रोजी सकाळी 10 वा. हनुमान मंदिर, रेल्वेस्टेशन शेजारी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक बाळासाहेब गोराणे यांनी केले.

यावेळी शरद देवकर, अ‍ॅड. रवींद्र हळनोर, संतोष राऊत, बाळासाहेब कोकरे, चांगदेव नजन, किशोर बिंगले, विठ्ठल पवार, संजय वडितके, अतुल वडितके, बापूसाहेब पवार योगेश राऊत यांच्यासह सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद देवकर यांनी तर दत्तात्रय खेमनर यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या