Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाफेड मार्फत लाल कांदा खरेदी: डॉ. भारती पवार

नाफेड मार्फत लाल कांदा खरेदी: डॉ. भारती पवार

नाशिक | Nashik

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यासह शेजारील गुजरात, मध्यप्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यात देखील कांद्याचे (Onion) मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आल्याने महाराष्ट्रातील कांद्याला बाहेरील राज्यात मागणी नसल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत. तसेच कांदा निर्यात सुरु असुन बाहेरील देशांची आर्थिक परिस्थिती नसल्याने कांद्याची मागणी कमी प्रमाणात होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे सध्याच्या स्थितीत कांद्याचे दर कोसळले आहेत, या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी नाफेड (Nafed) मार्फत लाल कांदा खरेदीला सुरवात झाली असुन दोन दिवसांत ९५० मेट्रिक टन लाल कांदा खरेदी करण्यात आला असल्याचे नाफेडचे व्यवस्थापक (Manager of Nafed) सुशिलकुमार यांनी सांगितले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी दिली आहे.

नाफेड मार्फत कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी सुरु झाल्याने कांद्याला योग्य तो हमीभाव मिळणार असुन शेतकऱ्यांनी कांदा नाफेडच्या अधिकृत केंद्रावर लिलाव करावा, असे आवाहन डॅा. भारती पवार यांनी केले आहे.

सद्यस्थितीत जिल्‍ह्यातील ८ केंद्रांवर कांदा खरेदी सुरु करण्यात आली असुन अधिक १० केंद्रावर म्हणजेच १८ केंद्रावर कांदा खरेदी करण्यात यावी, अशा सूचनाही नाफेड व्यवस्थापनाला दिल्या असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या