Friday, November 22, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात 36 केंद्रांवर होणार मका खरेदी; 1760 रुपये प्रतिक्विंटल दर: उत्पादकांना दिलासा

जिल्ह्यात 36 केंद्रांवर होणार मका खरेदी; 1760 रुपये प्रतिक्विंटल दर: उत्पादकांना दिलासा

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाकडून दरवर्षी आधारभूत किंमतीवर मका, ज्वारी व बाजरी धान्य खरेदी केले जाते. यंदा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये 25 व बीगर आदीवासी तालुक्यांसाठी 11 असे 36 केंद्रांवर मका खरेदी केला जाणार आहे. 1 हजार 760 रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी केला जाणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात यंदा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हैराण झाला आहे. यंदा मका पिकावर मोठया प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. औषध फवारणी करुनही हाता तोंडाशी आलेले मक्याचे पीक वाया गेले. त्यामुळे यंदा मक्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यातच परितीच्या पावसाचाही फटका या पिकाला बसला. परिणामी मक्याचे पीक कमी पण मागणी जादा अशी परिस्थिती आहे. गतवर्षीच्या तुलनेत मक्याला यंदा चांगला भाव मिळत आहे.

दरम्यान बाजारात काही ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दराने मका खरेदी केला जात आहे.त्यामुळे पुरवठा विभागाच्या मदतीने बिगर आदीवासी तालुक्यांमध्ये मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा मका आधारभूत किमतीने खरेदी केला जाणार आहे. मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये 25 व बीगर आदीवासी तालुक्यांसाठी 11 असे 36 केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे.

यात बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये येवला व सटाण्यात प्रत्येकी दोन केंद्र दिली असून सिन्नर,चांदवड,नांदगाव,मालेगाव,देवळा व निफाड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी, त्याचप्रमाणे खरेदी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला 31 डिसेंबरपर्यंत मका उत्पादकांना संबंधित केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या