Friday, February 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPushpa 2 The Rule : 'पुष्पा २: द रुल'ची छप्परफाड कमाई

Pushpa 2 The Rule : ‘पुष्पा २: द रुल’ची छप्परफाड कमाई

मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai

‘पुष्पा २: द रुल’ (Pushpa 2 The Rule) हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत त्याने कमाईच्या (Earnings) बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. सुमारे ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. एवढेच नाही तर ५०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात जलद प्रवेश करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे.यानंतर आता ‘पुष्पा २: द रुल’ ने रिलीजच्या ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी देखील मोठे कलेक्शन केले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाने (Movie) पहिल्या आठवड्यात ७२५ कोटी ८ लाखांची विक्रमी कमाई केली आहे.९ व्या दिवशी चित्रपटाने ३६ कोटी ४ लाखांची कमाई केली, तर १० व्या दिवशी ‘पुष्पा २: द रुल’चं कलेक्शन ६३.३ कोटी रुपये होतं. सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ ने रिलीजच्या ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, ‘पुष्पा २: द रुल’चे ११ दिवसांचं एकूण कलेक्शन आता ९०० कोटींवर पोहोचलं आहे. यामध्ये चित्रपटाने रिलीजच्या ११ दिवसांत तेलगूमध्ये २७९.३५ कोटी रुपये, हिंदीमध्ये ५५३.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ४८.१ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.५५ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

YouTube video player

दरम्यान, या चित्रपटाने रिलीजच्या ११ दिवसांत विक्रमी ९००.५ कोटींची कमाई करून इतिहास (History) रचला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ च्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे. भारतात ‘KGF २’ चे लाइफटाईम कलेक्शन ८५९.७ कोटी रुपये होते. त्यामुळे ‘पुष्पा२:द रुल’ हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दूसरा चित्रपट ठरला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...