Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामराठी पाट्या लावा; अन्यथा कारवाई

मराठी पाट्या लावा; अन्यथा कारवाई

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत ( Shops Boards in Marathi ) करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दुकानांच्या पाट्या बदलल्या नाहीत तर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Marathi Language Minister Subhash Desai )यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

- Advertisement -

मराठी पाट्या आणि मराठी विषय अनिवार्य करण्याच्या संदर्भात देसाई यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मराठी भाषा विभागाने महत्वाचे कायदे विधीमंडळात मंजूर करून घेतले. आता त्या कायद्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे असे सांगून देसाई पुढे म्हणाले की, दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीत करण्याच्या दृष्टीने प्रथम सर्व दुकानदारांना आवाहन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

पूर्वी स्पष्ट नियम नसल्याने दुकानदार पळवाटा काढत होते. पण विधिमंडळात कायदा केल्याने आता मराठीत भाषेत पाट्या करण्याचा नियम झाला आहे. मराठीत पाट्या लावण्याच्या नियमांची अंमलबजावणी महापालिका आणि नगरपालिकांवर सोपवण्यात आली आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना वेळ देण्यात आली आहे. असेही देसाई यांनी सांगितले.

मराठी विषय अनिवार्य

इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांना मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. शाळा चालकांना त्यांच्या शाळेत मराठी विषय शिकविण्याची व्यवस्था करण्याचा आग्रह करण्यासाठी अनेक मराठी मंडळे आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मराठमोळं मुलुंड या संस्थेचे अध्यक्ष हेमंत मोरे आणि माजी आमदार शरद खातू यांनी आज सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन मराठी भाषा विभागाला सहकार्य देण्याविषयी चर्चा केली. यावेळी मंडळाचे अन्य सदस्यही उपस्थित होते.

पाटीवर प्रथम मराठी

दुकाने-आस्थापनांच्या पाटी-बोर्डाच्या आकारापैकी ५० टक्के जागेत मराठी भाषेत नाव प्राधान्याने लिहावे लागेल. मग उर्वरीत जागेत इतर भाषेचा वापर करता येईल. अन्यथा कारवाई होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या