Thursday, May 15, 2025
Homeक्रीडा'त्या' ट्विटने पी.व्ही.सिंधूच्या निवृत्तीची चर्चा; जाणून घ्या काय आहे सत्यता

‘त्या’ ट्विटने पी.व्ही.सिंधूच्या निवृत्तीची चर्चा; जाणून घ्या काय आहे सत्यता

दिल्ली | Delhi

- Advertisement -

भारताच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूने नुकतेच सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली होती. या पोस्टने सगळे आश्चर्य चकित झाले आहे. पीव्ही सिंधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘I Retire’ असं जाहीर केलं आहे. तिच्या या ट्विटवरुन सिंधूने निवृत्ती घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सिंधूने आज दुपारी ‘I Retire’ लिहून पोस्ट शेअर केली आणि डेन्मार्क ओपन (Denmark Open) ही अंतिम स्पर्धा होती याबद्दल सिंधूने एका लांब पोस्टमध्ये लिहिले असून निवृत्ती घेण्याचे ठरवले असल्याचं जाहीर केलं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, सिंधूची पोस्ट नीट वाचता तिने बॅडमिंटनमधून निवृत्ती न घेतल्याचे कळते. सिंधूने पोस्टमध्ये लिहिले की, “मी माझ्या भावनांबद्दल समोर येऊन बोलायचं विचार करीत आहे. मला याला सामोरे जाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे मी काबुल करते. हे इतके चुकीचे वाटते. म्हणूनच मी, ‘आता बस झाले हे सांगण्यासाठी आज लिहित आहे. तुम्हाला धक्का बसला असेल किंवा गोंधळ झाला असेल तर हे समजण्यासारखे नाही परंतु जेव्हा आपण हे वाचून संपले तेव्हा माझ्या दृष्टीकोनाबद्दल आपणास समजेल आणि आशा आहे की त्यास देखील समर्थन द्याल.” सिंधूच्या अशा पोस्टमुळे ती निवृत्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आले.

त्यानंतर सिंधूने स्पष्ट केले की सध्याच्या कोरोना परिस्थितीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी तिने ही पोस्ट केली होती. ‘या साथीच्या रोगाने माझे डोळे उघडले, मी सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याशी लढण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेऊ शकले. मी हे आधीही केले आहे, मी हे पुन्हा करू शकते. पण संपूर्ण जगाचे निराकरण करणाऱ्या या अदृश्य विषाणूचा मी कसा पराभव करू,’ असे आपल्या पोस्ट मध्ये लिहिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...