Wednesday, September 11, 2024
Homeनाशिकसिंहस्थासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज; २ हजार ५२९ कोटींचा आराखडा सादर

सिंहस्थासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज; २ हजार ५२९ कोटींचा आराखडा सादर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक व त्र्यंबकेश्वर (Nashik and Trimbakeshwar) येथे २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळासाठी (Simhastha Kumbh Mela) सार्वजनिक बांधकाम विभागाने २५२९ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला असून, जिल्ह्यात विविध विकासकामे केली जाणार आहेत.

- Advertisement -

सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांचे दर्शन व वाहतूक नियोजन सुयोग्यपणे होण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) हा आराखडा तयार केला आहे. यात पर्यायी मार्गासाठी परिसरातील रस्ते दुरुस्ती करणे, भाविकांसाठी कायमस्वरुपी निवासव्यवस्था करणे, तात्पुरते वाहनतळ बांधणे अशा अनेक कामांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत बांधकाम विभागाकडून कुंभमेळ्यात कराव्या लागणाऱ्या कामांची यादी व त्यासाठी लागणारा खर्च याचे पीपीटीद्वारे (PPT) सादरीकरण करण्यात आले. या कामात प्रामुख्याने रस्ते दुरुस्तीसाठी (Road Repair) २ हजार ३८० कोटी, विश्रामगृह दुरुस्तीसाठी ६३ कोटी, वाहनतळ बनविणे तसेच साधुग्राम, पोलीस व येणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरती निवाराशेड, दवाखाना, दुकाने तयार करण्यासाठी ८६ कोटी असा एकूण २ हजार ५२९ कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

अशी होणार कामे

डहाणू-त्र्यंबक औरंगाबाद रस्ता, नांदगाव-पिंपळगाव अडसरे टाकेद रस्ता, वाकी घोपडगाव देवळा टाकेद रस्ता, साकुर फाटा पिंपळगाव भरविर रस्ता, खेड (भैरवनाथ मंदिर) ते कळसुबाई मंदिर ते इंदोर रस्ता, इंदोर ते लहान कळसुबाई मंदिर रस्ता, कावनई ते गोंदे व कावनई ते मुकणे रस्ता कॉक्रिटीकरण करणे, कावनई येथील मंदिराचे सुशोभिकरण करणे, इगतपुरी येथील कामख्या देवी मंदिर येथे सभामंडप बांधकाम व सुशोभिकरण करणे, बाळविहीर ते लोहारवाडी रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे, तसेच नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाजवळ ५० कक्षाचे व त्र्यंबकेश्वर येथे २० कक्षाचे, इगतपुरीत १० कक्षाचे नविन विश्रामगृह बांधणे, अस्तित्वातील नाशिकच्या विश्रामगृहाची दुरुस्ती करणे, पोलिसांसाठी वॉच टॉवर बांधणे, बॅरेकेटींग करणे, निवाराशेड बसवणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या