Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याQuality City Nashik : नाशिकच्या पहिल्या क्वालिटी प्रभागाची निवड

Quality City Nashik : नाशिकच्या पहिल्या क्वालिटी प्रभागाची निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) या स्वायत्त संस्थेने क्वालिटी सिटी उपक्रमा अंतर्गत नाशिक शहराची निवड केली असून, पहिला क्वालिटी प्रभाग उभारण्याचा मान प्रभाग क्रमांक 7 गंगापूररोडला देण्यात आला आहे.

या संदर्भातील प्रभाग 7 मधील महत्त्वाच्या मान्यवरांची बैठक प्रभाग 7 चे नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यावतीने मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत, जितुभाई ठक्कर, हेमंत राठी, आरोग्य अधिकारी कल्पना कुटे, कृणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत लायन्स क्लब, पंडित कॉलनी येथे पार पडली. या बैठकीला प्रभाग 7 मधील आबा पाटील, साई पाटील, कैलास लोणे, जानकीदास कोल्हे, सचिन गुळवे, संजय निकम, हेमंत मालपाणी, मनोज शर्मा, अजित बुरकुल, हेमंत शिंदे, अमोल जोशी, कल्पना धटिंगण, शेमकल्याणी, देवशाली साबळे, सरला गायकवाड, राहुल लोया, स्नेहल अहिरराव, दिलीप भामरे, प्रसन्ना तांबट, आनंद फरताळे, त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, दयानंद आहेर, अजय खोजे, दिलीप चव्हाण, गोसावी साहेब, प्रशांत बोरसे, शंतनू बोरसे आदी उपस्थित होते. आभार कृणाल पाटील यांनी मानले.

क्वालिटी प्रभागाची संकल्पना

प्रत्येकाला आपलं घर, आपला परिसर, आपला प्रभाग, आपलं शहर हे स्वच्छ व सुंदर हवे असणे स्वाभाविक आहे, परंतु त्या घराला, त्या परिसराला, त्या शहराला सर्वोत्तम बनवण्याबरोबर सर्वोत्तम शिक्षण, सर्वोत्तम आरोग्य, सर्वोत्तम सुविधा कश्या उपलब्ध होतील, हेच या अभियानाचे मुख्य लक्ष आहे. या साठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नाशिक नाशिक महानगरपालिका यांच्याबरोबर शहरातील विविध संस्था आय.एम.ए., निमा, क्रेडाई यांच्या साथीने नाशिक शहराला स्वच्छ, सुंदर व सर्वोत्तम कसे बनवता येईल या आराखडा तयार केला असून, तीन स्तरावत याची विभागणी केली आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वच्छता या त्रिसूत्रीत काम करून गुणवत्ता वाढवली जाईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

प्रभाग क्रमांक 7 ची रचना

गंगापूररोड हा अशोकस्तंभ, पोलीस वसाहत, पंडित कॉलनी, लोकमान्य नगर, गार्डन होम सोसायटी, गंगापूर नाका, मंगलनगर, सहदेव नगर, पंपिंग स्टेशन, असा विविध लोकवस्तींचा परिसर आहे. यात विविध स्लमपासून ते उच्चभू सोसायटी यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रभागात काम करण्याच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

नाशिक महानगरपालिका व शहरातील इतर सामाजिक संस्था यांचा योग्य रीतीने वापर केला तर आपल्या प्रभागांबरोबर आपले शहर देखील सर्वोत्तम शहर म्हणून आपली स्वताची ओळख निर्माण करेल. –

अजय बोरस्ते, माजी नगरसेवक प्रभाग 7

नाशिक शहरासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काम केले जाईल.

– भाग्यश्री बानायत, प्रभारी आयुक्त नाशिक मनपा

या क्षेत्रात करणार सुधारणा

या उपक्रमाद्वारे सफाई कर्मचारी ते घंटागाडी कर्मचारी त्याचप्रमाणे उद्योगातील चालक, गृहिणी, बांधकाम कामगार आणि व्यवस्थापक यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याबरोबरच ते शिक्षण आणि स्वच्छतेसाठी देखील मदत करतील. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवली जाईल. त्याचप्रमाणे प्रभागातील महत्वाच्या समस्या जसे कचरा, खड्डे, नाले, पाणी गळती, पावसाळी गटारी, पडीत जागा, गार्डन देखभाल, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यासाठी नागरिकांनी देखील समोर प्रबोधन करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या