Sunday, May 18, 2025
HomeनगरAhilyanagar : 42 गुणनियंत्रकांची कृषी केंद्रांवर राहणार करडी नजर

Ahilyanagar : 42 गुणनियंत्रकांची कृषी केंद्रांवर राहणार करडी नजर

खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाचे नियोजन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकर्‍यांना योग्य दरात दर्जेदार बियाणे खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने नियोजन आखले आहे. जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री करणार्‍या केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी 14 तालुक्यांत 42 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात 1983 पासून कृषी विभाग कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण योजना राबवत आहे. या योजनेत नगर जिल्ह्यात चालू वर्षी एक पूर्णवेळ व 41 अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले आहेत. यात जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी तालुका, मोहीम अधिकारी, पंचायत समितीमधील ज्येष्ठ कृषी पदवीधर, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तसेच महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम 2009 अन्वये अधिकार प्रदान केलेले कृषी मंडल अधिकारी यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात मुख्यालयात 1 व 5 अर्धवेळ असे 6 निरीक्षक, नगर तालुक्यात 4 अर्धवेळ, पारनेर तालुक्यात 2, श्रीगोंदा 2, कर्जत 4, जामखेड 2, पाथर्डी 2, नेवासा 2, राहुरी 2, श्रीरामपूर 4, संगमनेर 4, अकोले 2, कोपरगाव 2 आणि राहाता 2 आशा 42 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी हे जिल्ह्यात शेतकर्‍यांना दर्जेदार कृषी निविष्ठा प्राप्त होतात की नाही, याची तपासणी करणार आहेत. या पथकाकडून कृषी निवेष्ठांची नमुने काढणे त्यांची कागदपत्रे तपासणी, जादा दराने विक्री होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे, तसेच कृत्रिम टंचाईवर लक्ष ठेवणार आहेत.

मागीलवर्षी या गुणवत्ता नियंत्रक यांच्याकडून आखण्यात आलेल्या मोहिमेत बियाण्यांची 1 हजार 427 नमुने घेण्यात आले होते. यात 22 नमुने अप्रामाणिक घोषित करण्यात आले. तसेच 8 कंपन्यांच्या कृषी निवेष्ठांविरोधात कोर्ट केस करण्यात आल्या. तर 14 नमुन्यांवर प्रशासकीय कारवाई करत ताकीद देण्यात आली आहे. दोन विक्रेत्यांविरुद्ध न्यायालयात दावे करण्यात येऊन 149 प्रकरणी संबंधित कंपन्यांना विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत. कागदपत्रे अपूर्णतेमुळे 138 ठिकाणी रासायनिक खतांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असून एका ठिकाणी खतांची साठे जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कीटकनाशकांची 468 नमुन्यापैकी 28 नमुने व प्रामाणिक घोषित करण्यात आले असून 11 नमुन्यानविरुद्ध न्यायालयात गुन्हे डावे करण्यात आलेले आहेत.

गेल्या वर्षी जिल्ह्यात विविध कृषी केंद्रांचे 252 बियाणे परवाने रद्द करत, 11 ठिकाणी परवाने निलंबित करण्यात आले आहे. खतांचे 17 परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर कीटकनाशकांची 215 परवाने रद्द करत पाच परवाने निलंबित करण्यात असल्याची माहिती देण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईमंदिर परिसरात तथाकथित पीए टोळ्यांचा धुमाकूळ

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबा संस्थान परिसरात स्वतःला तथाकथित पीए म्हणून मिरवणार्‍या दलालांच्या टोळ्यांचा धुमाकूळ वाढला असून, झटपट दर्शनाच्या नावाखाली भाविकांची खुलेआम फसवणूक सुरू आहे. त्यामुळे...