Saturday, May 25, 2024
Homeधुळेशहादा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीसाठी सव्वा लाख मतदार

शहादा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीसाठी सव्वा लाख मतदार

शहादा Shahada । ता.प्र.-

तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींसाठी (gram panchayat election) होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल (Filing of candidature application) करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात 27 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 74 ग्रामपंचायतींचे एकूण 246 वार्ड असून 1 लाख 23 हजार 767 मतदार (quarter of a lakh voters) आहेत. निवडणूकीचा दृष्टीने प्रशासकीय नियोजन पूर्णत्वास आले असल्याची माहिती तहसीलदार (Tehsildar) डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, आजपर्यंत सरापंचपदासाठी 24 तर सदस्य पदासाठी 36 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

शहादा तालुक्यात 74 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू असून प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी पूर्ण केली आहे.सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. गणपती उत्सव व निवडणुका दोन्ही सोबत आल्याने प्रशासनाचा कामावरील ताण साहजिक वाढणार आहे. दोन वर्ष कोरोनामुळे निवडणुका लांबल्या होत्या. संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक होते. तालुक्यातील 74 ग्रामपंचायती होऊ घातलेल्या निवडणूकीत एकूण 246 वार्ड असून त्यात 60 हजार 852 स्त्री मतदार, 62 हजार 915 पुरुष असे एकूण 1 लाख 23 हजार 767 मतदार आहेत.

निवडणुकीच्या कामांसाठी विविध आस्थापनेचा 27 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांचा समावेश आहे.

निवडणूकीचा अर्ज भरण्याची अंतीम मुदत 1 सप्टेंबर आहे. मतदानासाठी अंदाजे 600 बॅलेट युनिट,300 कंट्रोल युनिटआदी यंत्र सामुग्री लागेल. तरमनुष्यबळ-प्रत्येक मतदान केंद्रावर एक केद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी, एक परिचर असे पाच लोक व पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. एकुण 2200 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे.

निवडणूक कर्मचार्‍यांना ने-आण करण्याकरिता 27 बसेस व 70 छोटया वाहनांची सोय करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रशिक्षणास सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे, असेही डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, आजपर्यंत सरापंचपदासाठी 24 तर सदस्य पदासाठी 36 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या