Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भवष्यि - मकर : सांपत्तिक आवक सुरळीत चालू राहील

त्रैमासिक भवष्यि – मकर : सांपत्तिक आवक सुरळीत चालू राहील

– सौ. वंदना अनिल दिवाणे

सप्टेंबर – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी प्लुटो द्वितीयात शनी, तृतीयात-नेपच्यून, चतुर्थात गुरू-राहू-हर्षल, सप्तमात रवि, अष्टमात मंगळ-बुध-शुक्र, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खू, खे, खो, गा,गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी-शनि, तत्त्व-पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही ना काही बदल हवा असे वाटत असते. दक्षिण दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, तमोगुणी, वात प्रकृती. स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. काळजी घ्या. शुभ रत्न- निलम, शुभ रंग-निळा, आकाशी व काळा. शुभदिवस- शनिवार, देवता- शनि. शुभ अंक- 8, शुभ तारखा- 8/17/26, मित्र राशी- कुंभ, शत्रु राशी- सिंह. उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष, सतत कामात मग्न.

अष्टमात बुध शत्रुंना नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रू स्वतःच्या कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खूष होऊन समाजातील छबी आणखीच उजळेल. प्रगती होईल.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजेारी यांच्याशी संबंध चांगले राहील्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उत्साही राहील. गायनवादनादी ललित कलांत प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेेपणाने केल्यामुळे मानसिक समाधान वाटेल.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 3, 4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30

ऑक्टोबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी प्लुटो, द्वितीयात शनी, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात गुरू-राहू-हर्षल, पंचमात-नेपच्यून, सप्तमात शुक्र,अष्टमात रवि-बुध, नवमात मंगळ, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. शंकराची उपासना केल्यास या दोषावर नियंत्रण होऊ शकेल. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होईल. मंगळ-शुक्र योगामुळे उत्साह टिकून राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील.

दशमातील केतूमुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरी मिळण्याचा योग आहे. वाहनापासून अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. बुद्धी तीक्ष्ण ठेवील. कारगिरी आवश्यक असलेले काम चांगले जमेल. नीचांची संगत टाळा. नाही तर नुसत्या भानगडीत अडकावे लागेल. प्रवास घडेल. त्यातून आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. वाहन चालवितांना सावध रहावे. अन्यथा अपघात ाचे भय आहे.

द्वितीयात शनी आहे. धनस्थानी असलेला शनीच आर्थिक आवक वाढवून काटकसरीचे पर्यायाने बचतीचे मंत्र शिकवेल. आर्थिक व्यवहार जपून करावे. भागीदारीचे व्यवहारात सतर्क रहावे. किंवा शक्यतो टाळावेत.

स्त्रियांसाठी – भाग्यस्थानी शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौंदर्याच्यादृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 20, 21, 22, 23, 24, 26, 30, 31

नोव्हेंबर- 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी प्लुटो, द्वितीयात शनी, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात गुरू -राहू-हर्षल,सत्पमात रवि, नवमात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमस्थानी रवि आहे. थोर सन्माननीय व्यक्तीशी वादविवाद खेळण्याची हौस वाटेल. पण बोलण्यात नकळत त्यांचा अपमान होणार नाही हे लक्षात ठेवा. सभेत, स्पर्धेत विजय मिळेल. राजकारणी लोकांना याची प्रचिती येईल.

चतुर्थस्थानातील गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिेकांना याचा विशेष अनुभव येईल. जमीन जुमला व सांपत्तिक आवक नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील. भाग्योदयासाठी घरापासून फार दूर जाण्याची गरज नाही. भपक्याची हौस वाटेल. पोकळ डौल मिरवण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळे लोकात हसे होण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी परदेशगमन करून भाग्य आजमावावे.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौंदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी- एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 16,18, 21, 22, 25, 28, 29

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या