Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - सिंह : प्रवासातून आर्थिक लाभ

त्रैमासिक भविष्य – सिंह : प्रवासातून आर्थिक लाभ

सौ.वंदना अनिल दिवाणे

जुलै – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, तृतीयात केतू, षष्ठात प्लुटो, सप्तमात शनि, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू-राहू-हर्षल, लाभात रवि-बुध, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे मा,मी,मू,मे,मो, टा,टी,टू,टे अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त्व-अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणताही बदल नको वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, सत्वगुणी, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, प्रकृती पित्तकारक, राशीचा अंमल हृदयावर आहे. सतर्क रहा. शुभ दिवस- बुधवार,रविवार. सूर्य उपासना लाभदायक, शुभ अंक-1, शुभ दिवस-1/10/19/28. मित्रराशी-मिथून, कन्या,मेष, धनु. शत्रुराशी-तुला,मकर. पराक्रमी, अधिकारप्रिय, अति आत्मविश्वास धोकादायक. मितभाषी, स्वतंत्रप्रिय, मातृभक्त, शेतीची आवड.

लाभस्थानी रवि आहे. आर्थिक आवक वाढेल. मागे केलेल्या श्रमाचा मोबदला चांगल्याप्रकारे मिळेल. पराक्रमाला जोर येईल.धार्मिक वृत्ती राहील. शत्रुवर विजय मिळवाल. चरित्र शुद्ध राहील. मित्र चांगले व मोठ्या कुळातील मिळतील. हाताखालच्या लोकांकडून कसून काम करून घ्याल.

स्त्रियांसाठी – व्ययस्थानी शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 3, 7, 8, 10, 11, 19,23, 24, 26

ऑगस्ट – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी-मंगळ-बुध-शुक्र, तृतीयात केतू, षष्ठात प्लुटो, सप्तमात शनी, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू-राहू-हर्षल, व्ययात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील त्यातून आर्थिक लाभ होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळींशी समरसून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. अडचणीत मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर चांगली श्रेदधा राहील.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःचीे जागा व संसार याबद्दल प्रेम राहील. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती कराल. कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सुक तरुणांना सुंदर पत्नी मिळेल.

मंगळ-गुरू नवपंचम योग नवनवीन कल्पना काढून अर्थप्राप्तीत वाढ करू शकाल. क्रीडाक्षेत्रांशी संबंधितांना उत्तम यश प्राप्त होईल. मोठ मोठे व्यवसाय करणार्‍यांना आपले साम्राज्य विस्तृत करता येईल. सार्वजनिक कार्य करणार्‍यांना त्यांच्या सत्यप्रियतेमुळे समाजात आदर व सन्मान मिळेल.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमेश गुेरू भाग्यस्थानी आहे. विद्यार्थी अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील. मात्र आळस झाडून नियमीतपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे रामदास स्वामींचे वचन लक्षा ठेवा.

शुभ तारखा – 2, 3, 5, 8, 12, 15, 17, 18, 19, 21, 22, 28, 29,

सप्टेंबर – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध, द्वितीयात मंगळ, तृतीयात केतू,षष्ठात प्लुटो, सप्तमात शनि. अष्टमात नेपच्यून, नवमात राहू-गुरू-हर्शल, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

भाग्यस्थानी गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील. लोकांना दिलेला सल्ला त्यांच्यासाठी उपयोगी व लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन होईल. जनशक्तीच्या आधारावर आपल्या उद्योग व्यवसायात प्रगती होईल. वृद्धांना तीर्थयात्रा घडतील. शक्तीप्रमाणे देशसेवा घडतील. काटकसरी वृत्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीेत. ज्योतिषशास्त्राची व धर्मशास्त्राची आवड राहील.

तृतीयस्थानी केतू असता भावा बहिणींशी संंबंध चांगले राहत नाही. आपापसात कलह उत्पन्न होण्याची शक्यता असते. मातेशीही पटणे कठीण जाते. याठिकाणी केतू असता शत्रूंचा नाश होतो. धनसंग्रहात वाद होतो. वारंवार लाभ होतो. दानशुर वृत्ती रहाते. भागीदारीच्या धंद्यात फायदा होतो. भाग्यवृद्धी होते. वादविवादाची हौस वाटेल. आळसाला दूर ठेवणेच चांगले.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी- माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा -1, 3, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या