Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - सिंह : कला व व्यापारातून धनप्राप्तीचा वेग वाढेल

त्रैमासिक भविष्य – सिंह : कला व व्यापारातून धनप्राप्तीचा वेग वाढेल

– सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑक्टोबर – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुधद्वितीयात मंगळ, तृतीयात केतू, , षष्ठात प्लुटो, सप्तमात शनी, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरम-राहू-हर्षल, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त्व- अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणताही बदल नकोसा वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरुष, सत्वगुणी, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, प्रकृती-पित्तकारक,राशीचा अंमल हृदयावर आहे. सतर्क रहावे. शुभ दिवस- रविवार, बुधवार. सूर्य उपासना चांगली आहे. शुभ अंक-1, शुभ तारखा-1/10/19/28. मित्र राशी-मिथून, कन्या, मेष, धनु. शत्रू राशी- तुला,मकर, कुंभ. पराक्रमी व अधिकारप्रिय, अतिआत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो. याचे सदैव स्मरण असावे. मितभाषी, स्वतंत्र वृत्ती, मातृभक्त, शेतीची आवड.

तनुस्थानी रवि आहे. राजमान्यता मिळेल. कामाच्या घाईगर्दीमध्ये भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. स्वभाव उदार राहील. थोडासा लोभीही राहील. बुद्धी तीव्र राहील. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी -द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी -बुद्धी तीक्ष्ण राहील. त्यामुळे परीक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव वाढवावा. मार्क्स चांगले मिळतील.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 20, 21, 22, 23, 24, 26

नोव्हेंबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या धनस्थानी शुक्र, तृतीयात मंगळ-बुध-केतू, षष्ठात प्लूटो, सप्तमात शनि, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू-राहू-हर्षल, व्ययात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. अनेक मोठ्या व्यापार्‍यांशी ओळख होईल. त्यामुळे उलाढालीत वृद्धी होईल. आर्थिक आवक वाढेल. गूढविद्येविषयी आकर्षण वाढेल. भावी घटनांविषयी स्वप्नाद्वारे सूचना प्राप्त होईल. तृतीयात बुधामुळे साहसाकडे कल राहील. विद्याव्यासंगात भर पडेल.लोकहिताची कामे कराल. व्यापारी लोकांशी मैत्री होईल. कला व व्यापार यांच्या संगमातून धनप्राप्तीचा वेग वाढेल.

भाग्यस्थानी गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील. लोकांना दिलेला सल्ला त्यांच्यासाठी उपयोगी व लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. पुष्कळ लोकांचा विश्वास संपादन होईल. जनशक्तीच्या आधारावर उद्योगव्यवसायात प्रगती होईल. विद्वान लोकांत गौरव प्राप्त होईल. परदेशगमन केलेल्यांचा भाग्योदय होईल. शक्तीप्रमाणे देशसेवा घडेल. काटकसरीची वृत्ती ठेवल्यामुळे आर्थिक अडचणी येणार नाही. ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रांची आवड वाटेल.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 16, 18, 21, 22, 25, 28, 29

डिसेंबर – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी केतू, तृतीयात शुक्र, चतुर्थात रवि-मंगळ, पंचमात बुध, षष्ठात प्लुटो, सप्तमात शनि, अष्टमात राहू-नेपच्यून, नवमात गुरू- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. साहजिकच त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता दर्शवितो. वाहनापासू अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. घरात आग किंवा चोरीची भिती आहे. सावध रहाणे चांगले. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकलावेत. वृद्धांनी घरच्यांशी जमवून घ्यावे. अन्यथा उगीचच मनःस्ताप सहन करावा लागेल. उद्योग व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. कापूस, चांदी, हिरे यांच्या व्यापार्‍यांसाठी फार चांगला महिना राहील. वाहन खरेदीस चांगला महिना आहे. बंधु सुख उत्तम राहील.

तृतीयस्थानी शुक्र आहे. कृपणवृत्ती राहील. पराक्रमाला जोर येईल. डोळ्यांच्या विकाराची शक्यता आहे. कवी वर्गाला उत्तम कविता सुचतील. स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. विवाहोत्सुंकांचे सहज जुळतील.

धनस्थानी केतू आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कर्जापासून दूर रहा. कर्ज घ्यावे लागल्यास हप्ते वेळेवर भरण्याची जागरूकतेने काळजी घ्यावी.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायन ललित कलात प्रगती होईल. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. टी.व्ही. खेळ याकडे दुर्लक्ष करा. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1, 2, 5, 6, 7, 8, 14, 15, 17, 18, 21, 24, 27, 31

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या