Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - तुला : राजकृपेने लाभ होतील

त्रैमासिक भविष्य – तुला : राजकृपेने लाभ होतील

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी केतू, चतुर्थात-प्लुटो, पंचमात शनी, षष्ठात-नेपच्यून, सप्तमात राहू-गुरू- हर्षल, दशमात रवि, लाभात बुध-शुक्र-मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते अशी आहेत. राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी- शुक्र, तत्व- वायू, चर राशी असल्याने स्वभाव चंचल . पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असते. रजोगुणी, स्वभाव क्रूर,त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल पोटावर आहे. शुभ रत्न – हिरा, शुभ रंग- पांढरा. शुभ दिवस- शुक्रवार, देवता-लक्ष्मी, संतोषी. शुभ अंक-6, शुभ तारखा- 6/15/4. मित्र राशी-मिथुन, मकर, कुंभ, धनु, कर्क. शत्रुराशी – सिंह. संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा, वाणी आकर्षक व प्रभावशाली घमेंड, अतिधूर्तता, मानसिक संतुलन चांगले.

लाभस्थानी मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख अवश्य करा. कारण त्यापैकी काही मतलबी, ढोंगी, लबाड असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगत ठेवल्यास भांडणाचे प्रसंग वारंवार येतील. स्थावर इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

स्त्रियांसाठी – धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 2, 3, 5, 8, 12, 15, 17, 18, 19, 21, 22, 28, 29

सप्टेंबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी केतू, चतुर्थात-प्लुटो, पंचमात शनी, षष्ठात-नेपच्यून, सप्तमात राहू-गुरू- हर्षल, दशमात शुक्र, लाभात रवि-बुध, व्ययात-मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू सिद्धीस जातील. शत्रूंनाही गोड बोलून वश कराल. संगीताची फार आवड वाटेल. सभा संमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीला एकादशातील बुध फार चांगला समजला जातो. आध्यात्मिक उन्नती साध्य करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापक यांच्या विद्वत्तेचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्राची आवड असल्यास प्रगती होईल.

दशमात शुक्र हा एक उत्तम शुभयोग आहे. सर्व प्रकारचे भाग्य तुमच्याकडे चालत येईल. ग्रामीण व शहरी असा भेद रहाणार नाही. मातृ-पितृ सुख उत्तम राहील. व्यवसाय नोकरीत प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्राप्ती होईल. बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. राजमान्यता मिळेल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरी मिळेल. ती ही मोठ्या अधिकाराची.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30

ऑक्टोबर- 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ- केतू, चतुर्थात प्लुटो, पंचमात शनी, षष्ठात नेपच्यून, सप्तमात गुरू-राहू-हर्षल, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू, दशमात राहू-हर्शल, लाभात शुक्र, व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात हर्षल विवाहाच्या बाबतीत विवाहोत्सुकांना चमत्कारीक अनुभव देईल. मुळात विवाह फार उशीरा होण्याची शक्यता आहे. विवाह अगदी ठरला असे वाटावे व ऐनवेळी दुसर्‍यास्थळी व्हावा. असा काही अनुभव येईल. विरोधकांवर नैतिक विजय मिळवाल. नव्या ओळखीतून फायदा .

सप्तमस्थानी गुरू आहे. विवाहोत्सुकांना चांगला जोडीदार मिळेल. थोर लोकांची संगत प्राप्त होईल. उत्तम स्थळी प्रवास घडेल. स्वजातीच्या उन्नतीसाठी कार्य कराल. अविवाहीतांचा भाग्योदय होईल. कोर्ट कचेर्‍यांच्या कामात यश मिळेल. पित्यापेक्षा मोठी योग्यता प्राप्त करण्याचा योग आहे. स्वतःच्या सामर्थ्यांबद्दल गर्व वाटेल. गर्वाविषयी मात्र संयम ठेवा. गर्वाचे घर खाली ही म्हण लक्षात ठेवा. विद्वान लोकांत मान मिळेल.

स्त्रियांसाठी – व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी- माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा – 1,3, 6, 8, 10, 20, 21, 22, 23, 24, 26

- Advertisment -

ताज्या बातम्या