Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मीन : आकस्मिक धनलाभ

त्रैमासिक भविष्य – मीन : आकस्मिक धनलाभ

सप्टेंबर – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात गुरू-राहू-हर्षल, पंचमात रवि, षष्ठात मंगळ-बुध-शुक्र, अष्टमात केतू, लाभात प्लुटो, व्यात शनि अशी ग्रहस्थितीे आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे, दी, दू, झा,ज्ञा, था, दे,दो,चा, ची अशी आहेत. राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरुद्ध तोंड केलेल्या माशांखी जोडी असे आहे. राशी स्वामी-गुरू, तत्त्व-जल, राशी द्विस्वभावी असल्याने निर्णयाच्या बाबतीत सदैव तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा फायद्याची आहे. लिंग-स्त्री, सत्वगुणी, वर्ण- ब्राह्मण, स्वभाव- सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल पायावर आहे. पायाच्या दुखापतीविषयी सावध रहा. शुभ रत्न-पुष्कराज, शुभ रंग -पिवळा, शुभ दिवस-गुरूवार, देवता-विष्णू, मित्रराशी-कर्क, वृश्चिक, शत्रुराशी- मेष, सिंह, धनू. अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, अध्ययनशील, विनम्र, कल्पनाप्रिय, परिश्रमी, स्वप्रयत्नाने प्रगती होईल.

षष्ठस्थानी मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. त्यामुळे शत्रुंचा नाश करणे सहज सोपे जाईल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कुटुंबात निष्कपटपणे वागल्यामुळे कौटुंबिक वातावरण शांत राहील. पंडित जणांशी मैत्री राहील.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 1,3, 4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30

ऑक्टोबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात गुरू-राहू-हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-बुध, सप्तमात मंगळ, अष्टमात केतू, लाभात प्लुटो, व्ययात शनि अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयातील हर्षल कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक शिस्त पाळल्यास तसा त्रास होणार नाही.मोठमोठ्या योजना आखण्याचे तूर्त स्थगित ठेवून पुढे ढकलावे. वाहनासंबंधीत संस्थांमधून नोकरी मिळण्यास हा काळ चांगला आहे. अंथरुण पाहून पाय पसरावे. अन्यथा मोठ्या योजना अर्ध्यातच राहतील.

द्वितीय स्थानातील गुरुमुळे विद्वत्तेबद्दल विशेष नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्वात विशेष यश मिळेल. केवळ शब्दाने लोकांवर हुकूमत गाजवाल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल. सुग्रास भोजन प्राप्त होईल. द्वितीयात गुरू असणे हा भाग्यवृद्धीचा एक स्वतंत्र योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती कराल. कौटुंबिक सुख उत्तम राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल. कर्जापासून त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज वेळेवर परत करावे.

स्त्रियांसाठी – व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 1, 6, 7, 10, 20, 21, 22, 23, 24, 26

नोव्हेंबर- 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, धनस्थानी-गुरू- राहू-हर्शल, पंचमात रवि, सप्तमात शुक्र, अष्टमात मंगळ-बुध-केतू, लाभात प्लुटो, व्ययात शनीअशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमातील बुध शत्रंचा नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रू स्वतःच्या कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायात संबंधीत आलेले पाहुणे खूष होऊन तुमची समाजातील छबी आणखीच उजळेल.

पंचमात शुक्र आहे. विषयलोलुपतेकडे कल राहील. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावईदेखील सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे खूप आकर्षण वाटेल. शत्रुवर विजय मिळेल. प्रेमप्रकरणात फसगत होईल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललित कथालेखन, सट्टे ,शेअर्स यापासून लाभ होतील. सरकार दरबारी चांगले वजन राहील. कन्येचा विवाह जुळण्याचा योग आहे.

एकादशात प्लुटो आहे. आकस्मिकरितीने धनलाभ होण्याचा योग संभवतो.

व्ययस्थानी शनी आहे. धार्मिक बाबतीत तुमची अशी स्वतंत्र मते असली तरी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील.

स्त्रियांसाठी – धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कलाक्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश व पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 16, 18, 21, 22, 25, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या