Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य : वृश्चिक : आर्थिक आवक चांगली होईल

त्रैमासिक भविष्य : वृश्चिक : आर्थिक आवक चांगली होईल

– सौ.वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीयात प्लूटो, चतुर्थात शनि, पंचमात नेपच्यून, षष्ठात गुरू-राहू-हर्षल, नवमात रवि. दशमात बुध-मंगळ-शुुक्र, व्ययात केतूअशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे तो, ना,नी,नू, ने,नो, या, यी, यू अशी आहेत.राशी स्वामी-मंगळ, उत्तर दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री आहे. म्हणून स्वभाव सौम्य आहे. वर्ण- ब्राह्मण. कफ प्रवृत्ती. पाठीसंबंधी आजाराची संभावना आहे. शुभ रत्न-पोवळे, शुभ रंग-लाल, शुभ वार-मंगळवार, देवता-शिव, हनुमान, भैरव. शुभ तारखा- 9/18/27. मित्र राशी-कर्क,मीन. शत्रुराशी-मेष,सिंह,धनु. क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार कराल. प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधे, डॉक्टर्ससाठी चांगली रास. दृढप्रतिज्ञ, साहसी, कर्मठ, स्पष्टवादी.

दशमात मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल. त्यातून त्यांचा फायदाही होईल. मात्र स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे काहीसे कठीण जाईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहीली तरी खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 2, 3, 5, 8, 12, 15, 17, 18, 19, 21, 22, 28, 29

सप्टेंबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी तृतीयात प्लूटो, चतुर्थात शनि, पंचमात नेपच्यून, षष्ठात गुरू-राहू-हर्शल, नवमात शुक्र,दशमात रवि-बुध, लाभात मंगळ, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानातील रविमुळे महत्त्व प्राप्त होईल. राजकारणी लोकांंना विशेष प्रचिती येईल. निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ता अथवा पुढारी विशेष प्रचारकार्य करण्यात चांगले यश मिळेल. अलीकडच्या काळात पिता पुत्राचे चांगले पटत नाही पण तुम्हाला मात्र पितृसुख उत्तम मिळेल.

दशमात बुध आहे. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. नावलौकीक वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यात उत्तम यश मिळेल. वक्तृत्वाला बहर येईल. प्रतिभेच्या परिसस्पर्शाने पुनीत झालेले लेखन लेखकाच्या लेखणीतून उतरेल. सज्जन लोकांची संगत प्राप्त होईल. या सर्वांचा परिणाम म्हणून आर्थिक आवक वाढेल. ही आवक सन्मार्गाने असल्यामुळे तणावरहित असेल.

स्त्रियांसाठी – भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौंदर्याच्या दृष्टीने वृध्दी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 3, 4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30

ऑक्टोबर- 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयात प्लुटो, चतुर्थात शनी, पंचमात नेपच्यून, षष्ठात गुरू-राहू-हर्षल, दशमात शुक्र लाभात रवि-बुध, व्ययात मंगळ-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठात गुरू आहे. सहावा गुरू चांगला नाही असे समजले जाते. माणूस बलहीन होतो. शत्रू जिंकण्याची शक्यता असते. मात्र वैद्यकीय व्यवसायास हा गुरू पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करणे फार आवडेल. नोकर वर्गालाही हा गुरू चांगला आहे. नोकरी त पदोन्नती होण्याची किंवा इच्छित स्थळी बदली होण्याची शक्यता आहे. वयोमानानुसार वजन वाढू नये नये यासाठी नियमीतपणे हलका व्यायाम करा. शरीर निरोगी राहील. मात्र पचनाच्या किरकोळ तक्रारी चालू रहातील.

षष्ठस्थानी राहू आहे. आतापर्यंत जास्त त्रासदायक ठरलेल्या शत्रूंचा समाचार घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्याशी धाडसाने दोन हात केल्यास त्यांचा पूर्ण पराभव करण्यास निश्चीतपणे यश मिळेल. त्यानंतर मात्र विरोधी लोकांना तुमच्यासमोर उभे राहण्याचेेदेखील धाडस राहणार नाही. कृषी उद्योगाशी संबंधित बागाईतदार व अन्य शेतकर्‍यांना पशुधनापासून उत्तम लाभ होईल. पराक्रमाला जोर येईल.

स्त्रियांसाठी – चतुर्थस्थानी असलेला शनी महिलांसाठी विशेष चांगला नाही. स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्नात वाढ करावी म्हणजे खर्चास कठीण जाणार नाही. वाढत्या भावामुळे घरातील खर्चाचे बजेट सांभाळणे कठीण जाईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमातील नेपच्यून विद्यार्थ्यांना अंतःस्फूर्ती प्रदान करील. पाठांतरासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. सतत वाचन केल्यास कोणताही विषय अवघड जाणार नाही. याची प्रचिती येईल.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 20, 21, 22, 23, 24, 26

- Advertisment -

ताज्या बातम्या