Monday, June 17, 2024
Homeभविष्यवेधधनसंग्रह सहज शक्य होईल

धनसंग्रह सहज शक्य होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisement -

फेब्रुवारी-2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात बुध, पंचमात रवि-प्लुटो, षष्टात शुक्र-शनि-नेपच्यून, सप्तमात गुरू, अष्टमात राहू-हर्षल, नवमात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे रा, री, रू, रे, रो, ता,ती, अशी आहेत. राशीचे चिन्ह

तराजू आहे. राशी स्वामी- शुक्र, तत्त्व-वायू. चर रास असल्यामुळे स्वभाव चंचल आहे. पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष, त्यामुळे काही बायकांची वागणूक पुरूषी थाटाची असते. स्वभाव क्रूर, प्रकृती त्रिदोष. राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न हिरा, शुभ रंग- पांढरा, शुभ दिवस- शुक्रवार, देवता- लक्ष्मी, संतोषी. शुभ अंक-6, शुभ तारखा – 6/15/24. मित्र राशी- मिथून, मकर, कुंभ, धनु, कर्क. शत्रु राशी – सिंह. संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक. गुणईर्षा. घमेंड, अतिधूर्तता. मानसिक संतुलन चांगले. विनोदी वृत्ती.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावईदेखील सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. शत्रुवर विजय मिळवाल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत.

स्त्रियांसाठी – पतीराजांचे उत्तम सहकार्य मिळेलश कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळा. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा –3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

मार्च – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी केतू , चतुर्थात – प्लुटो, पंचमात रवि-बुध-शनि, षष्ठात गुरू- शुक्र-नेपच्यून, सप्तमात राहू – हर्षल, अष्टमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासाला निघावे वाटेल. विद्याभ्यासात चंचल बुद्धीमुळे खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवला पाहिजे. अशी ओढ लागेल. त्यासाठी शेअर्स, व्यापार, बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक अशाप्रकारचे व्यवहार कराल. काहींना त्यातून पैसाही मिळेल. पण असे व्यवहार जपून करावे. विनाकारण विषाची परीक्षा घेणे धोक्याचे ठरेल.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होईल. पुत्र सुख उत्तम मिळेल. उपासनेत मन लागेल. मानसिक शांती प्राप्त होईल. लेखकांना साहित्य क्षेत्रात साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. गूढशास्त्रांची आवड वाटेल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह करणे शक्य होईल. राजकारणी लोकांना राजसत्तेत भाग मिळू शकेल. प्रतिष्ठेचे पद प्राप्त होईल. बुद्धीमत्तेने इतरांना चकीत कराल.

पंचमात शनि आहे. शरीर प्रकृती सुदृढ राहील. शत्रुवर विजय मिळवाल. स्थावरासंबंधी लाभ होतील. सार्वजनिक संस्था, राजकारण, व्ही.आय.पी. लोकांशी संबंध यात चांगले यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत यश मिळेल. व्यापार्‍यांना लाभ होत राहील.

स्त्रियांसाठी – महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. तूर्त दुर्लक्ष करा.

शुभ तारखा – 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 3े1

एप्रिल -2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, चतुर्थात प्लूटो, पंचमात शनी, षष्ठात गुरू-रवि-बुध- नेपच्यून, सप्तमात शुक्र-राहू-हर्शल, नवमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीची विचारणा होण्याची शक्यता आहे.

मंगळ-शुक्र शुभयोगामुळे उत्साह टिकून राहील.कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल. विवाहात्सुकांचे विवाह जमतील.

सप्तमातील हर्षल विवाहाच्या बाबतीत विवाहोत्सुकांना चमत्कारिक अनुभव देईल. पत्नीसंबंधी काही विवंचना निर्माण होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. विवाह फार उशीरा होण्याची शक्यता आहे. विवाहसंबंध ठरला असेल असे वाटावे व ऐनवेळी दुसर्‍या स्थळी व्हावा असा काही विवाहोत्सुकांचा अनुभव येईल. विरोधकांवर नैतिक विजय मिळेल. पण आर्थिक लाभ होणार नाही. नव्या ओळखीतून फायदा होईल.

षष्ठस्थानी गुरू आहे. सहावा गुरू लाभत नाही असे म्हटले जाते. शत्रु जिंकण्याची शक्यता असते. मात्र वैद्यकीय व्यवसायाला हा गुरू पोषक आहे. नोकरवर्गालाही हा गुरू विशेष चांगला आहे.

स्त्रियांसाठी -पती पत्नीचे प्रेम आपापसात चांगले राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नये. काटकसर करावी.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या