Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मेष

त्रैमासिक भविष्य – मेष

ऑगस्ट – 2021

आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्थानी हर्षल, द्वितीयात राहू , चतुर्थात रवि-बुध, पंचमात मंगळ- शुक्र, अष्टमात केतू , दशमात शनि प्लुटो, लाभात गुरु-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची अध्याक्षरे चू, चे, ची, ला,ली लू अशी आहे. राशीचे चिन्ह मेंढा आहे. राशीस्वामी मंगळ. तत्त्व अग्नी. चर राशी असल्यामुळे अतिशय चंचल. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष, वर्ण क्षत्रिय. स्वभाव क्रूर,पित्त प्रकृती, राशीचा अंमल डोक्यावर. इजा होण्यापासून काळजी घ्या. शुभ रंग लाल, शुभ रत्न पोवळे. शुभ दिवस . मंगळवार, रविवार. देवता शिव, भैरव, मारोती. शुभ अंक -9, शुभ तारखा- 9,11,30.मित्र राशी- सिंह, तुला, धनु. शत्रु राशी- मिथुन, कन्या. स्वभाव अत्यंत क्रोधी, कुटुंबाचे उत्तम प्रकारे पालनपोषण कराल.आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात काम करत राहण्याचा कंटाळा येईल. पण तसे करणे फायद्याचे रहाणार नाही.धरसोड वृत्तीमुळे पैसा, वेळ व प्रयत्न वाया जातो व शेवटी पदरात काहीही पडत नाही. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही.

स्त्रियांसाठी – व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा –4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 25, 26, 27, 28, 30, 31

सप्टेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशिस्थानी हर्षल,द्वितीयात राहू, पंचमात रवी मंगळ, षष्टात बुध शुक्र, अष्टमात केतू, दशमात शनि प्लूटो, लाभात गुुरू नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासाला निघावे वाटेल. अभ्यासात खंड पडेल. काहीही करून पैसा मिळावलाच पाहिजे अशी ओढ लागेल. त्यात शेअर्स,व्यापार, बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक असे व्यवहार कराल. असे व्यवहार जपून करा.विनाकारण विषाची परिक्षा घेणे तोट्याचे आहे.

पंचमात शुक्र आहे. विषयलोलूपतेकडे कल राहील. सरकारी दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होतील. जावई सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. देवीची उपासना लाभदायक आहे. शत्रुवर विजय मिळवाल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहे. ललित कला, सट्टे, शेअर्स यापासून लाभ होतील. सरकारी दरबारी वजन वाढेल.

नवमात प्लुटो आहे. परदेशमगनाच्या प्रयत्नात असाल तर यश मिळेल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 3, 7, 8, 9, 10, 13, 14, 15, 16, 19, 21, 23, 29, 30

ऑक्टोबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्षल, द्वितीयात राहू, षष्ठात रवि-मंगळ- बुध, अष्टमात शुक्र- केतू, नवमात प्लुटो , दशमात गुरु-शुक्र- शनी, लाभात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

दशमात गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा त्यात यश मिळेल. स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका होईल एवढे उत्पन्न मिळेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल.

दशमात शनि आहे. भाग्यवृद्धी होईल. राजाप्रमाणे सुख उपभोगाल. आपल्या क्षेत्रात थोर अधिकार मिळतील. स्वपराक्रमाने उदयास याल. उद्योगशीलता उत्तम राहील. नम्रतेमुळे लोकप्रियतेत वृद्धी होईल.

षष्ठात मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्यात यश मिळवाल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कौटुंबिक वातावरण शांत राहील.

लग्नी हर्षल आहे. धाडसाकडे कल राहील.स्वभाव कमालीचा चंचल लहरी राहील. इतरांना विचीत्र वाटेल. स्वतःला कितीही फिलगूड वाटले तर इतरांना तसे वाटले पाहिजे.

स्त्रियांसाठी – अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24, 26, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या