Thursday, June 20, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक आवक वाढेल

आर्थिक आवक वाढेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisement -

एप्रिल – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, चतुर्थात केतू, सप्तमात प्लूटो, अष्टमात शनी, नवमात रवि-बुध-गुरू- नेपच्यून, दशमात राहु-हर्षल-शूक्र, अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीचीे आद्याक्षरे ही, हू, हे, हो, डा,डी, डू, डू, डो अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी-चंद्र, तत्व-जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्वगुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती. राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न-मोती, शुभ रंग, पांढरा,क्रीम. शुभ दिन-सोमवार, शुभ अंक-2, शुभ तारखा-2/11/20/29, मित्र राशी- वृश्चिक,मीन, तुला. शत्रु राशी- मेष, सिंह, धनु, मकर. अध्ययनाची आवड, जलप्रिय, भावनाप्रधान,कुशल प्रबंधक, कल्पनाशील, भावुक, विचारी, परोपकारी.

भाग्यातील रविमुळे जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकीक वाढेल. बाहेर होणार्‍या उदो उदोमुळे घरातील लोक समाधानी होण्यापेक्षा उत्साह भंग करतील. माता पित्यांशी जनरेशन गॅपमुळे पटणार नाही.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी –विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 3, 4, 6, 7, 13, 14, 16, 17,21, 22, 23,25, 28, 29, 30

मे – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी शुक्र-मंगळ,चतुर्थात केतू, सप्तमात प्लूटो, अष्टमात शनि, नवमात नेपच्यून, दशमात रवि-बुध-राहू-गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानी बुध आहे. विद्याव्यसंगात वृद्धी होईल. नावलौकीक वाढेल. राजकारण्यांची लोकप्रियता वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यात उत्तम यश मिळेल. वक्तृत्वाला बहर येईल. प्रतिभेच्या स्पर्शाने पुनित झालेले लेखन लेखकाच्या लेखनीतून उतरेल. सज्जन लोकांची संगत प्राप्त होईल. या सर्वांचा परिणाम म्हणून आर्थिक आवक वाढेल. तीही सन्मार्गाने असल्यामुळे तणावरहीत राहील.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. हौशी व रंगेल स्वभावाची त्यात भर पडेल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याविषयी प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकाल. नेहमी कामात व्यस्त राहणे आवडेल. विवाहोत्सुक तरूणांना सुंदर पत्नी मिळेल.

रवि मंगळ जिरेेकादश योग होत आहे. या योगामुळे धाडसी वृत्ती राहील. उदारवृत्ती राहील. अधिकारी व मोठ मोठ्या लोकांशी संबंध येईल. अधिकार प्राप्त होतील. पोलीस व लष्करातील लोकांचा याचा प्रत्यय येईल.

स्त्रियांसाठी – धार्मिकतेकडे कल राहील. बोलतांना कटू शब्द वापरणे टाळल्यास घरात तणावरहीत वातावरण राहील. अपघातातून आश्चर्यकारकरित्या सुटका होईल. पतीराज शब्दाबाहेर जाणार नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहिल.

शुभ तारखा – 2, 3, 7, 9, 10, 12, 15, 16, 21, 22, 24, 25, 28, 29, े30

जून – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-शुक्र, चतुर्थात केतू, सप्तमात प्लूटो, अष्टमात शनि, नवमात नेपच्यून, दशमात बुध- गुरू-राहू-हर्षल, लाभात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानी गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. यशस्वी व्हाल. स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका होण्याइतपत उत्पन्न मिळेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. लष्करी वृत्तीला अंकुश लावा. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार नाही. गुरूजनांवर प्रेम राहील. धैर्यशील वृत्तीमुळे कोणत्याही संकटात माघार घ्यावी लागणार नाही. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. जनसेवेची हौस वाटेल. व्यापार, वैदयकीय कामे, राजकृपेतून आर्थिक प्राप्ती वाढेल.

चतुर्थस्थानी केतू आहे. पराक्रमी धनधान्याने युक्त रहाल. सत्यवादी व पराक्रमी असाल. बोलणे गोड,मधुर, आकर्षक राहील. दुसर्‍याचे दोष काढण्याची वृत्ती कमी करावी. नाही तर मित्रवर्गाकडून नेहमी अपमान सहन करावा लागेल. शिवाय खोटे आळ येतील ते वेगळे.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी-शाळा नुकत्याच सुरू झाल्या असल्याने अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. आळस टाळलेला बरा.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 11,12, 14, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या