Friday, May 3, 2024
Homeनगरट्रक चालकांकडून वाराई स्वरुपात होणारी वसुली त्वरीत बंद करा

ट्रक चालकांकडून वाराई स्वरुपात होणारी वसुली त्वरीत बंद करा

संगमनेर | प्रतिनिधी

ट्रक मालकाकडून व्यापारी व हमाल लोडींग व अनलोडींग अवैधरित्या वाराई स्वरुपात होणारी वसुली त्वरीत बंद करण्यात यावी, अशी मागणी दि संगमनेर तालुका मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (The Sangamner Taluka Motor Transport Association) राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Sangamner Agricultural Produce Market Committee) शासकीय गोडावून, निमशासकीय गोडावून, एमआयडीसी (MIDC), कारखाने, साखर कारखाने तसेच संगमनेर शहरातील व तालुक्यातील खासगी व्यापारी हे ट्रक व्यावसायिक चालक मालकांकडून गाडीत माल भरलेल्या मालाचे लोडींग-अनलोडींग (Loading-unloading) वाराई अवैधरित्या वसुली करत आहे. वास्तविक ट्रक व्यावसायिकाचा माल नेण्याचा व आणण्याचा संबंध आहे तो माल भरणे, खाली करणे ही जबाबदारी संबंधित व्यापारी मानधनी, कारखानदार यांची आहे. त्याच्याशी ट्रक व्यावसायिकाचा काहीही संबंध नाही, परंतू मागील काही वर्षापासून ही अवैधरित्या वाराई हमाली ट्रक व्यावसायिकांकडून घेतली जाते आहे. त्यामुळे ट्रक व्यावसायिकाला विनाकारण आर्थिक मंदीच्या काळात नुकसान सहन करावे लागत आहे.

या वसुलीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी.आर काढून ती वसुली व्यापारी व कारखानदार यांना द्यावी. त्याच्याशी ट्रक व्यावसायिकांचा काहीही संबंध नाही. याबाबत संबंधित अधिकार्‍यांना तसा आदेश काढलेला आहे. त्या आदेशाची प्रत उपलब्ध आहे. तरी महाराष्ट्र शासनाने जी.आर. नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, शासकीय गोडावून, निमशासकीय गोडावून, एमआयडीसी, कारखाने, साखर कारखाने, खासगी व्यापारी यांना तसे आदेश त्वरीत काढावे, व ज्याचा माल असेल त्यांनीच हमाली व वाराई हे नियम लागू करावेत, अशी मागणी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना याबाबतचे निवेदन मुंबई येथे असोसिएशनच्यावतीने देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे रामदास गुंजाळ, शेखर गाढे, सुनिल शिंदे, जमिर बेग, शरीफ शेख, निसार शेख, मतिन शेख आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या