Tuesday, May 7, 2024
Homeभविष्यवेधभविष्यवेध : स्पष्टवक्ता उद्योजक !

भविष्यवेध : स्पष्टवक्ता उद्योजक !

साधारणपणे सरकारी धोरणांशी जुळवून घेणारे उद्योजक जगभर दिसतात. कारण त्यांचा राजकीय घडामोडींपेक्षा उद्योगवाढीकडे अधिक कल असतो. या गटात प्रसिद्ध उद्योजक राहुल कमलनयन बजाज बसत नाहीत. त्यांच्याच नेतृत्वात आजच्या बजाज कंपनीचा विस्तार झाला आहे.

पण लोककल्याणाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड ते स्वीकारत नाहीत. सरकारला चुका लक्षात आणून देण्यासाठी किंचीतही संकोच न बाळगता थेट सुनावण्याची त्यांची शैली उद्योग वर्तुळात सातत्याने चर्चेचा विषय ठरली आहे.

- Advertisement -

सरकार कोणाचे आहे, याचाही मुलाहिजा ते बाळगत नाहीत. स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लायसन्स राजच्या विरोधात थेट दंड थोपटण्याचे धाडस त्यांनी दाखविले होते. आताही देशभर भीतीचे वातावरण आहे. सरकारविरोधात कोणी बोलत नाही, असे केंद्र सरकारला सुनावण्याची हिंमत त्यांच्याशिवाय अन्य कोणी उद्योगजगतातून केल्याचे आढळत नाही. त्यामुळेच त्यांचे उद्योगजगतातील मित्र त्यांना त्यांचा उल्लेख ‘निडर’ असा करतात.

हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1968 मध्ये राहुलजींची बजाज उद्योग समूहात उमेदवारी सुरू झाली. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेल्या उद्योग समूहाला राहुलजींनी 70 व 80 च्या दशकात वेग दिला. ‘हमारा बजाज’ या घोषवाक्यासह भारतीय दुचाकी बाजारात प्रभाव निर्माण करणारा हा काळ.

बजाज चेतक आणि सुपर या स्कुटर्सने त्याकाळी बजाज समूहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र यामागे होता राहुलजींचा संषर्घ. इटालीयन कंपनी व्हेस्पाने तांत्रिक मदतीचा हात आखडता घेतल्यानंतर थेट भारतीय बनावटीच्या स्कुटरद्वारे त्यांनी भारतीय रस्त्यावर अधिराज्य गाजविले.

2000 च्या दशकात स्कुटरपुढे जपानी मोटारसायकल्सने आव्हान उभे केले. या काळातही झपाट्याने बदल स्वीकारत बजाज मोटारसायकलीच्या उत्पादनाकडे वळली. 2005 मध्ये आपले सुपुत्र राजीव यांच्याकडे कंपनीची सूत्रे सोपविली. त्यानंतरही राहुलजी सामाजिक जीवनात आपला सहभाग नोंदवीत राहिले. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी चमकदार कामगिरी केली. उद्योगात त्यांनी धाडसाने पावले टाकली. समाजजीवनातही त्यांनी हा गुण जोपासला. अनेकांना त्यांचा हा स्वभाव फटकळ वाटतो. काहींना त्याचा फटकाही बसतो. पण मनातील भावना व्यक्त करताना जराही न कचरणारे राहुलजी अनेकांना भावतातही. आगामी काळातही त्यांना मानसन्मानाचे योग आहेत. भारतीय उद्योग क्षेत्रातील आपले वेगळे स्थान त्यांनी आजवर अबाधित राखले आणि यापुढेही राखतील, असे कुंडलीतील योग आहेत.

कुंडलीची वैशिष्ट्ये –

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे पहाटे 4.46 वाजता झाला. पत्रिकेत सुनफा योग, धुर्धरा योग, आधी योग, चतुशाग्र योग, वसुमती योग, आमला योग, वेसी योग, उभयचारी योग, बुधाटिदत्य योग, देहक्षता योग, मातृमूल योग, युक्तिसमान विद्वागिनी योग, सुमुख योग, सत्कलत्र योग आहेत. वृषभ लग्न व तूळ राशीच्या या पत्रिकेत बुध-शुक्र, गुरू-शनी, यांचा अन्योन्य योग तर बुध-शुक्र-चंद्र मित्र राशींना तसेच नवमांशात रवि-गुरू-शनी व शुक्र स्वराशींना तर हर्षल-मंगळ-केतू चंद्र राशींना या पत्रिकेतील जमेच्या बाजू होत. रवि वृषभेला मंगळ मिथुनेला, सप्तमात वृश्चिकेला राहू तर सुखस्थानी नेपच्यून या पत्रिकेतील कमकुवत बाजू असून पत्रिकेचा दर्जा 70 टक्के आहे.

 स्वभाव वैशिष्ट्ये –

वृषभ लग्न व तूळ राशीच्या या पत्रिकेत रवि-बुध-लग्नी असल्याने स्पष्टवक्तेपणा, समयसूचकता, स्वतःचे म्हणणे समोरच्याला सहज पटवून देण्याची क्षमता स्वतःमध्ये असल्याचा वेळोवेळी लाभ होतांना दिसतो. व्ययेष मंगळ द्वितीयात शुक्रासह अंशिक युतीत असल्याने रसिकता तसेच एखाद्या गोष्टीत किंवा प्रश्नात स्वतःला पूर्णपणे सामावून घेणे मात्र कशातच न अडकणे हे स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. काही वेळेस धाडसाने घेतलेल्या निर्णयाचे जबरदस्त फायदे होतात. तर काही वेळेस त्यातून उदासीनता जाणवते. स्वभावात टोकाची कठोरता व तितकीच कोमलता प्रसंगानुरूप जाणवते. कोणतेही कार्य इतरांकडून स्वतःच्या मनाप्रमाणे व नियोजनाप्रमाणे करवून घेण्याची निसर्गदत्त देणगी लाभलेली आहे. स्वतःचे विचार किंवा मत न घाबरता व्यक्त करणे व हजरजबाबीपणा हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अतिशय फटकळ व तिरकस बोलण्यामुळे काही वेळेस नाराजी ओढवते. स्वादिष्ट  व गोड पदार्थांची जास्त आवड आहे. स्मरणशक्ती तीव्र असल्याने भुतकाळातील सर्व गोष्टी सहज लक्षात राहतात. सत्पात्री दान करण्याचा सातत्याने प्रयत्न व जशास तसे ही आपल्या स्वभावाची वैशिष्ट्य आहेत.

 करिअर –

12 फेब्रुवारी 1965 नंतर स्वतःच्या कर्तृत्वाला सुरूवात झालेली दिसते. 08 जानेवारी 1971 नंतर यशाचा आलेख खर्‍या अर्थाने उंचावण्यास सुरुवात झालेली आहे. 09 जानेवारी 1988 पर्यंत सातत्याने कार्यक्षेत्राचा विस्तार होतांना दिसतो. 1988 ते 07 जानेवारी 1995 व्यवसाय, आरोग्य, वैयक्तिक अडचणींमुळे चढउतार व अस्थिरता वाढलेली आपणास दिसते. 1995 ते 2015या काळात चढ उतारांसह यश, स्थैर्य, राजकारण व सामाजिक मान सन्मानाचे योग अनुभवास आलेले दिसतात. 09 जानेवारी 2015 नंतर विविध प्रयोगांनी जगाशी स्पर्धा करावी लागत आहे. 09 डिसेंबर 2023 पर्यंत संघर्ष व नवनवीन प्रयोगातून उद्योग क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व व सन्मान जाणवत राहण्याचे योग आहेत, व त्यानंतर निवृत्तीकडे मार्गक्रमण होतांना दिसते. भारतीय उद्योगक्षेत्रात मैलाचा दगड म्हणून सातत्याने आपले स्थान अबाधित राहण्याचे योग आहेत.

 आरोग्य –

रक्तदाब, किडनी, उष्णतेशी संबंधित आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास विशेष चिंता करण्याचे कारण नाही. 02 जानेवारी 2024 ते 09 एप्रिल 2025 याकाळात आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्य व सौख्याकरिता उजव्या करंगळीत पाचू रत्न धारण करावे. पांढर्‍या रंगाचा वापर जास्त करावा. गुरुवार व मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या